WPL 2023, MIvsDC | दिल्ली कॅपिट्ल्सची तुफानी खेळी, मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

| Updated on: Mar 20, 2023 | 10:15 PM

दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेलं आव्हान दिल्लीने 1 विकेटच्या मोबदल्या पूर्ण केलं.

WPL 2023, MIvsDC | दिल्ली कॅपिट्ल्सची तुफानी खेळी, मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने दणदणीत विजय
Follow us on

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 18 वा सामना पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात आला. या स्पर्धेत दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ होती. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्ली विजयासाठी 110 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. या विजयासह दिल्लीने पराभवाचा वचपा घेतला. या दोन्ही संघात या पहिल्या मोसमात 9 मार्च रोजी सामना खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता.

दिल्लीने विजयासाठी मिळालेलं 110 धावांचं आव्हान दोरजार फटकेबाजी करत झटपट पूर्ण केलं. दिल्लीने हे आव्हान अवघ्या 9 ओव्हरमध्ये पूर्ण केल्याने त्यांना नेट रन रेटमध्ये मोठा फायदा झाला आहे. दिल्लीकडून एलिस कॅप्सी हीने 17 बॉलमध्ये 1 फोर आणि 5 सिक्ससह 38 धावांची नाबाद खेळी केली. कॅप्टन मेग लॅनिंग हीने 22 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 षटकारसह नॉट आऊट 32 रन्स केल्या. तर दिल्लीने शफाली वर्माच्या रुपात एकमेव विकेट गमावली. शफाली हीने 15 बॉलमध्ये 6 चौकार आणि 1 षटकारासह 33 रन्सची वादळी खेळी केली.

मुंबईची बॅटिंग

त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. दिल्लीने मुंबईला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. यास्तिका भाटीया, हॅली मॅथ्यूज आणि नॅट ब्रंट या तिघी अनुक्रमे 1,5 आणि 0 धावांवर बाद झाल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि वाँग या दोघींनी प्रत्येकी 23 धावा केल्या. पूजा वस्त्राकर हीने सर्वाधिक 26 धाावंचं योगदान दिलं. अमनजोत कौर हीने 19 रन्स जोडल्या. अमेलिया केर हीने 8 धावा केल्या. तर हुमायरा काझी 2 धावांलर नाबाद राहिली. मारिजाने काप, शिखा पांडे आणि जेस जोनासेन या तिकडीने 2 तर अरुंधती रेड्डी हीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

हे सुद्धा वाचा

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, इस्सी वोंग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स | मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे आणि पूनम यादव.