मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमबॅक करण्याचं मोठं आव्हान भारतीय गोलंदाजासमोर होतं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ 3 बाद 327 धावांवर खेळत होता. त्यामुळे कमबॅकसाठी भारताला विकेटची गरज होती. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मोहम्मद सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. 163 धावा करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला तंबूत पाठवलं. त्यानंतर मोहम्मद शमीने कॅमरून ग्रीनला बाद करत संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र एका बाजूने स्मिथ किल्ला लढवत होता. त्यामुळे विकेट घेणं गरजेचं होतं. यासाठी गोलंदाज प्रयत्न करत होते. कर्णधार रोहित शर्माही एकही अपील सोडत नव्हता. वारंवार डीआरएस घेण्याबाबत विकेटकीपर आणि गोलंदाजाशी चर्चा करत होता.
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अलेक्स कॅरे फलंदाजी करत होता. शमीची गोलंदाजी खेळताना त्याला त्रास होत होता. शमीही त्याला बाद करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोरदार अपील केली. त्यानंतर रोहित शर्मा तिथे धावत आला आणि अपील बाबत चर्चा केली. पण डीआरएस घेतला नाही.
Cheeky from Rohit Sharma to escape from the DRS review. pic.twitter.com/GFo5o5Lef9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 8, 2023
षटकाच्या सहाव्या चेंडूवरही तशीच जोरदार अपील करण्यात आली. चेंडू कॅरेच्या पॅडवर आदळल्याबरोबर जोरदार अपील झाली. डीआरएसची वेळ संपेपर्यंत रोहित शर्माने शमी आणि विकेटकीपर श्रीकर भरतसोबत चर्चा केली. एक क्षण असं वाटलं की डीआरएस घेणार नाही. पण रोहित शर्माने वेगळीच अॅक्शन करत पंचांना कन्फ्यूज केलं. हात तसाच ठेवला पण टेकवला नाही. त्यामुळे पंचही संभ्रमात पडले. डीआरएस घेतला नसल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.