WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना असलेल्या ओव्हलवरील खेळपट्टीचं गूढ, खेळाडूंची धाकधूक वाढली
WTC 2023 Final India vs Australia : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहे. मात्र ओव्हलची खेळपट्टीबाबत दोन्ही संघांमध्ये संभ्रम आहे.
-
-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर असताना प्लेइंग इलेव्हनबाबत संभ्रम आहे. नेमकी खेळपट्टी कशी असेल याबाबत आकडेवारी काही भलतंच सांगत आहे. (Photo: ICC Twitter)
-
-
टीम इंडियाचे सर्व खेळाडू आता लंडनच्या ओव्हल स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. (Photo: ICC Twitter)
-
-
143 वर्षांचा इतिहास असलेल्या ओव्हल मैदानावर पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होत आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांना कशी साथ याबाबत अजूनही संभ्रम आहे. (Photo: ICC Twitter)
-
-
मिस्ट्री पिच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनिंग्टन ओव्हलवर भारतीयांनी सराव सुरू केला आहे. प्रामुख्याने गोलंदाज चांगला सराव करत आहेत. (Photo: ICC Twitter)
-
-
ओव्हलने भूतकाळात वेगवान गोलंदाजांना पसंती दिली होती, तर गेल्या सहा सामन्यांमध्ये याच्या विरुद्ध परिस्थिती दिसून आली आहे. 2016 पासून ओव्हलवर झालेल्या शेवटच्या 6 कसोटींमध्ये फलंदाजांना पूरक असल्याचं दिसून आलं आहे. (Photo: ICC Twitter)
-
-
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 269 आहे, दुसऱ्या डावात 280 पर्यंत वाढते आणि तिसऱ्या डावात 326 च्या शिखरावर पोहोचते. त्यामुळे ओव्हलवर खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी फलंदाजी सोपी होत असल्याचे सूचित होते. (Photo: ICC Twitter)
-
-
टीम इंडिया वेगवेगळ्या पद्धतीने सराव करत आहे. भारतीय खेळाडू वेगळ्या रंगाच्या चेंडूंवर झेल घेण्याचा सराव करताना दिसले. आयपीएलमध्ये पांढरा चेंडू वापरला जातो, तसाच लाल चेंडू वापरण्याची सवय लावण्याची ही रणनीती आहे. (Photo: ICC Twitter)
-
-
जर टीम इंडिया आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यात यशस्वी ठरली, तर क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणताही संघ करू शकणार नाही असा दुर्मिळ विक्रम लिहिला जाईल. जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप जिंकली तर ते वनडे, टी-20 आणि कसोटी अशा तीन फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरेल. (Photo: ICC Twitter)