टीम इंडिया सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप स्पर्धेच्या गदेने हुलकावणी दिली. टीम इंडियाला 2021 साली न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर त्यानंतर 2023 साली ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियावर मात केली. आता सध्या टीम इंडिया या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसर्या स्थानी आहे. तर टीम इंडियाचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी सातव्या स्थानी आहे. मात्र त्यानंतरही क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा महामुकाबला व्हावा, अशी आशा आहे. हे शक्य आहे का? पाकिस्तानला फायनलसाठी किती सामने जिंकावे लागतील? त्याचं समीकरण जाणून घेऊयात.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसऱ्या साखळीत पाकिस्तान आणखी 9 सामने खेळणार आहे. पाकिस्तानने या 9 पैकी 7 सामने जिंकले, तर ते अंतिम फेरीत पोहचू शकतात. मात्र पाकिस्तानने 2 पैकी अधिक सामने गमावले, तर त्यांचं अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न पुन्हा भंग होऊ शकतं. तसेच पाकिस्तानने 9 पैकी 6 सामने जिंकले, 2 सामने अनिर्णित राहिले आणि 1 गमवला तरीही ते अंतिम फेरीत पोहचू शकतात. मात्र पाकिस्तानने 2 सामने गमावले आणि 1 मॅच ड्रॉ राहिली तर शेजाऱ्यांसाठी जर तरची स्थिती असेल.
टीम इंडियाला आतापर्यंत या तिसऱ्या साखळीत 10 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने 10 पैकी 7 सामने जिंकले तर अंतिम फेरीत प्रवेश करेल. मात्र टीम इंडियाने 3 पेक्षा अधिक सामने गमावले, तर अंतिम फेरीत पोहचण्याची हॅटट्रिक हुकेल.
टीम इंडिया नंबर 1
South Africa made a jump of two places in the latest #WTC25 table after a win over West Indies 👊
More ➡ https://t.co/54sfGcfjxE#WIvSA pic.twitter.com/UuqliwLf9a
— ICC (@ICC) August 18, 2024
टीम इंडियाने या साखळीतील 10 पैकी 6 सामने जिंकले तर 2 सामने गमावले आणि 2 सामने बरोबरीत सोडवण्यात यश आलं, तरीही रोहितसेना फायनलमध्ये पोहचेल. तसेच टीम इंडियाने 5 सामने जिंकले, 3 गमावले आणि 2 अनिर्णित राहिले, अशा परिस्थितीत रोहितसेनेला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागेल. या सर्व जरतरचं समीकरण जुळून आले, तरच टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात अंतम सामना होऊ शकतो.