वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेची चुरस आता अंतिम टप्प्यात आली आहे. वेस्ट इंडिज, बांग्लादेश, पाकिस्तान, इंग्लंड हे संघ स्पर्धेतून आधीच आऊट झाले आहेत. आता यात न्यूझीलंडची भर पडली आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. या पराभवामुळे न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या शर्यतीतून आऊट झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत केल्याने ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान गाठलं आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्वेवारी 60.71 इतकी आहे. तर 59.26 विजयी टक्केवारीसह दक्षिण अफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर पराभवामुळे भारताची घसरण तिसऱ्या स्थानावर झाली आहे. भारत 57.29 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा संघ 50 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉपला असलेल्या या चार संघातच अंतिम फेरीसाठी चुरस असणार आहे. त्यामुळे आता पुढचं गणित काय ते या संघातच असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीसाठी भारताचे अजून तीन सामने शिल्लक आहे. भारताने तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. जर एखाद्या सामन्यात पराभव झाला तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिकेच्या कामगिरीवर लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियाचे एकूण पाच सामने शिल्लक आहे. भारताविरुद्ध तीन आणि श्रीलंकेविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे इतर संघांचं लक्ष लागून असेल. भारत आणि श्रीलंका कशी कामगिरी करते याकडे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाने पाच पैकी तीन सामने जिंकले तर अंतिम फेरीत स्थान पक्कं होईल.
श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी श्रीलंकेला एकूण तीन सामने खेळायचे. त्यापैकी एका सामन्याचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. जर हा सामना श्रीलंकेने गमावला तर स्पर्धेतील स्थान डळमळीत होणार आहे.
दक्षिण अफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी एकूण तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी श्रीलंकेविरुद्धचा सामना विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यात विजय मिळवताच दक्षिण अफ्रिका अव्वल स्थान गाठणार आहे. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यांची मालिका असणार आहे. या मालिकेत पाकिस्तानने दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर भारताला फायदा होईल.