WTC Final 2023 मधील पराभवानंतर राहुल द्रविड आणि दोघांना बीसीसीआयकडून नारळ?

| Updated on: Jun 13, 2023 | 7:04 PM

टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव झाला. बीसीसीआय टीम इंडियाच्या या पराभवानंतर मोठा बदल करणार असल्याच्या मानसिकतेत असल्याचं दिसून येतंय.

WTC Final 2023 मधील पराभवानंतर राहुल द्रविड आणि दोघांना बीसीसीआयकडून नारळ?
Follow us on

मुंबई | ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. टीम इंडियाचं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महांतिम सामन्यात पराभव झाला. टीम इंडियाने अखेरीस 23 जून 2013 रोजी आयसीसी चॅम्पिनय ट्रॉफी जिंकली. तेव्हापासून आतापर्यंती टीम इंडियाला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडिया 2014 पासून चौथ्यांदा आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत झाली. त्यामुळे टीम इंडिया अंतिम सामन्यापर्यंत पोहचतेय तर खरी, मात्र थोडक्यासाठी प्रयत्न अपुरे ठरतायेत.

टीम इंडियाची गेल्या 10 वर्षांपासून हीच तऱ्हा असल्याने चाहते आणि समर्थकही संतापले आहेत. या निराशानजनक पराभवामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंसह कोचिंग आणि सपोर्ट स्टाफलाही टीका सहन करावी लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला आता बीसीसीआयही एक्शन मोडमध्ये आलेली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतर सपोर्ट स्टाफविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय. बीसीसीआयने सपोर्ट स्टाफला फैलावर घेतलंय.

इनसाईड स्पोर्टसने बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त प्रकाशित केलंय. या वृत्तानुसार, आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभव लक्षात ठेवत बॅटिंग आणि बॉलिंग कोच या पदाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या विक्रम राठोड यांच्याकडे टीम इंडियाच्या बॅटिंग कोचची जबाबदारी आहे. तर पारस महाम्ब्रे हे बॉलिंग कोच आहेत.

हे सुद्धा वाचा

बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, “या सर्व गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. सर्वच काही योग्य झालं असं आम्ही म्हणू शकत नाही. आम्ही भारतात जिंकण्यात यशस्वी ठरलो. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनमध्ये पोहचणं मस्करी नाही. मात्र परदेशातील कामगिरी ही अपेक्षेनुसार राहिली नाही. या दरम्यान आम्हाला वनडे वर्ल्ड कपकडेही लक्ष द्यावं लागेल. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 4 महिने बाकी आहेत. आम्ही कोणताही विचार न करता बेधडक प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र आमच्याच एक चर्चा होईल”.

दरम्यान राहुल द्रविड हेड कोच म्हणून वनडे वर्ल्ड कप 2023 पर्यंत जबाबदारी सांभाळणार आहेत. आशिया कप, टी 20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतरही बीसीसीआयने द्रविडवर विश्वास दाखवलेला आहे. आता वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर द्रविडबाबत चर्चा केली जाणार आहे.