लंडन | ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यात शानदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयाासाठी 444 धावांचं आव्हान दिलं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडिया 234 धावांवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाचा अशाप्रकारे 209 धावांनी विजय झाला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह इतिहास रचला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिेकेटच्या तिन्ही फॉरमेटमधील वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम ठरली आहे. तर टीम इंडियाची वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. टीम इंडियाच्या या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे.
रोहितने पराभवानंतर प्रतिक्रिया देताना टीम इंडियाच्या चाहत्यांचे आभार मानले. ऑस्ट्रेलियाचं कौतुक केलं. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे शतकवीर स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांचंही कौतुक केलं.
“आम्ही टॉस जिंकून चांगली सुरुवात केली. आम्ही पहिल्या सेशलनमध्ये चांगली बॉलिंग केली. नंतर आमची गोलंजदाजी पाहून आम्ही निराश झालो. याचं सर्व श्रेय हे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना द्यावं लागेल. ट्रेव्हिस हेड स्टीव्हन स्मिथ याच्यासोबत भारी खेळला”, अशा शब्दात रोहितने ट्रेव्हिचं कौतुक केलं.
“कमबॅक करणं अवघड होतं. मात्र आम्ही चांगली फाईट दिली. आम्ही शेवटपर्यंत लढलो. ती चार वर्षे आम्ही खूप मेहनत केली. दोन फायनल खेळणे ही आमच्यासाठी चांगली कामगिरी आहे. पण आम्हाला आणखी पुढे जायचंय. आम्ही गेल्या दोन वर्षात इथवर येण्यासाठी खूप काही केलंय. ते तुम्ही नाकारु शकत नाहीत. सर्वांनी प्रयत्न केले. दुर्दैवाने आम्ही जिंकलो नाही”, अशी खंत रोहितने यावेळेस व्यक्त केली.
“दरम्यान रोहितने अखेरीस चाहत्यांचे आभार मानले. क्रिकेट चाहते हे आमच्या पाठीशी होते. मी प्रत्येक चाहत्याचा आभारी आहे. ते प्रत्येक रन आणि विकेटनंतर जल्लोष करत टीमचा जोश वाढवण्याचा प्रयत्न करत होते”,असं रोहितने नमूद केलं.
ऑस्ट्रेलिया : 469&270-8 d (173 धावांची आघाडी)
टीम इंडिया : 269&234
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.