WTC Final 2023 | अजिंक्य रहाणे याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये संधी मिळणार?

| Updated on: Apr 04, 2023 | 8:25 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे. याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. श्रेयस अय्यर या महामुकाबल्याआधीच बाहेर पडला आहे.

WTC Final 2023 | अजिंक्य रहाणे याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये संधी मिळणार?
Follow us on

मुंबई | न्यूझीलंडने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात 2-0 ने पराभूत केलं. किवींनी श्रीलंकेवर पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवल्याने टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये एन्ट्री झाली. टीम इंडिया तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत होती. टीम इंडियाने ती मालिका 2-1 ने जिंकली. पण न्यूझीलंडने लंकेचा पराभव केल्याने टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा मार्ग मोकळा झाला. टीम इंडियाची सलग WTC Final मध्ये पोहचण्याची ही दुसरी वेळ ठरली. आता या गदेसाठी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

श्रेयस अय्यर हा बॅक इंजरीमुळे wtc final 2023 मधून बाहेर झाला आहे. श्रेयसला या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळता आले नाही. वनडे सीरिजमधूनही तो बाहेर झाल्या. त्यानंतर आयपीएलमधूनही त्याला बाहेर पडावं लागलं. आता त्याला wtc final 2023 मध्ये खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. आता श्रेयस बाहेर पडल्याने त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

श्रेयसच्या जागी टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या अजिंक्य रहाणे याला संधी देण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांची आहे. अजिंक्य गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारातूनही त्याला वगळण्यात आलं. त्यामुळे रहाणेच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं.

हे सुद्धा वाचा

रहाणेला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. टीम इंडियाला याआधी 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना जिंकण्याची संधी होती. मात्र तेव्हा न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. मात्र यंदा टीम इंडियाने पुन्हा फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट रहाणेला संधी देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.