मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी भिडणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. तर 12 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. मात्र या महामुकाबल्यात टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे भारताचं उपकर्णधार कोण असणार हे वारंवार विचारलं जात आहे. या दरम्यान याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजारा याला उपकर्णधार करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी संघातील खेळाडूंची अंतिम यादी ही 23 मे पर्यंत द्यायची आहे. त्यामुळे तोपर्यंत उपकर्णधार म्हणून खेळाडूचं नाव सांगावं लागेल. त्यामुळे चेतेश्वर पुजारा याला ती जबाबदारी मिळू शकते. जमेची बाजू म्हणून पुजारा याने याआधी उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
“चतेश्वर पुजारा हाच उपकर्णधार असेल. याबाबत सर्वांना माहिती आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही.जेव्हा अंतिम संघ पाठवण्यात येईल तेव्हा उपकर्णधार म्हणून खेळाडूचं नाव जाहीर केलं जाईल”, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्ससोबत बोलताना दिली.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे.