लंडन | ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड या स्टार ऑलराउंडरने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. ट्रेव्हिस हेड याने खणखणीत वनडे स्टाईल शतक ठोकलं आहे. ट्रेव्हिस याचं हे कसोटीतील सहावं शतक ठरलं आहे. तसेच ट्रेव्हिस ऑस्ट्रेलियाकडून आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या इतिहासात शतक ठोकणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. ट्रेव्हिसच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत पोहचली आहे.
ट्रेव्हिस 99 धावांवर पोहचला. त्याला शतकासाठी फक्त 1 धावेची गरज होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी ट्रेव्हिसला एका धावेसाठी चांगलाच तंगवला. ट्रेव्हिसला एका धावेसाठी फार संघर्ष करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्या एक रनसाठी ट्रेव्हिसला रडवलं. मात्र ट्रेव्हिसने अखेर 65 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एक धाव घेत शतक पूर्ण केलं.
ट्रेव्हिस हेड याचं शतक
The first centurion in World Test Championship Final history ?
Take a bow, Travis Head ?
Follow the #WTC23 Final ? https://t.co/wJHUyVnX0r pic.twitter.com/PFyd7UzcZX
— ICC (@ICC) June 7, 2023
दरम्यान ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळत टीमला मजबूत स्थितीत पोहचवलं आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी द्वशतकी भागीदारी केली आहे. ट्रेव्हिस आणि स्टीव्ह या दोघांनी 295 बॉलमध्ये 200 धावांची भागादीर केली.
ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेन याच्या रुपात 24.1 ओव्हरमध्ये 76 धावांवर तिसरी विकेट गमावली होती. मात्र त्यानंतर ट्रेव्हिस आणि स्टीव्ह या जोडीने कमाल केली. या दोघांनी नाबाद द्विशतकी भागीदारी करत टीम इंडियाला बॅक फुटवर ढकललं आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करण्यासाठी ही जोडी कोणत्याही परिस्थितीत फोडावी लागणार आहे.
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.