लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023 महाअंतिम सामना 7 जूनपासून लंडनमधील द ओव्हल इथे खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया आमनेसामने भिडणार आहेत. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी करणार आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरु आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आदिदासच्या नव्या जर्सीत फोटोशूट केलंय. या नव्या जर्सीत टीम इंडियाचे खेळाडूंचा हटके लूक दिसतोय. टीम इंडियाच्या खेळाडूंचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकरने टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शुबमन गिल याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये असलेल्या रिलेशनशीपच्या चर्चा खऱ्या असल्याचं म्हटलं जात आहे. शुबमन आणि सारा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून काहीतरी सुरु असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे. आता या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
सारा तेंडुलकर हीने हा फोटो ट्विट केलेला नाही. ज्या ट्विटर अकाउंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे, तो सारा तेंडुलकर फॅन अकाउंट आहे. त्यामुळे साराने शुबमनचा फोटो शेअर केलेला नाही, हे स्पष्ट होतं.
शुबमन गिल याचा फोटो
दरम्यान झिंबाब्वेचे माजी कर्णधार आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक राहिलेले एँडी फ्लॉवर यांची ऑस्ट्रेलिया टीमच्या सल्लागर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.