मुंबई | रविचंद्रन अश्विन, टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज फिरकी गोलंदाज. आर अश्विन याचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे या निर्णयावरुन क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली. अश्विनसारख्या दिग्गजाला वगळण्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आला. या निर्णयावरुन टीम इंडिया मॅनेजमेंटवर सडकून टीका करण्यात आली. अनेकांनी हैराणी व्यक्त केली. आर अश्विन टीममध्ये असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगतायेत. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
आर अश्विन याने ऐतिहासिक कामगिरी केलीय. आर अश्विन आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी सर्वाधिक दिवस विराजमान राहणारा खेळाडू ठरला आहे. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये इतर गोलंदाजांच्या तुलनेत अश्विन हे सर्वात जास्त दिवस अव्व्ल स्थानावर कायम राहलाय. त्यामुळे अश्विन याचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.
आर अश्विन याने आतापर्यंत 92 कसोटी सामने खेळले आहेत. अश्विनने या 92 कसोटी सामन्यांमध्ये 474 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 33.5 च्या एव्हरेजने या विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनचा स्ट्राईक रेट हा 51.84 इतका आहे. सोबतच अश्विनने 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. तर 7 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 140 धावा देऊन 13 विकेट्स ही अश्विनची सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी राहिलीय.
आर अश्विन
Ravi Ashwin has the Most days as No.1 Test bowler for India in ICC Test rankings in the history.
The GOAT of Test Cricket. pic.twitter.com/ViCadqAem1
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 14, 2023
शिवाय अश्विनने वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्येही आपली छाप सोडलीय. अश्विनने 113 वनडे सामने खेळले आहेत. अश्विनने या 113 सामन्यांमध्ये 151 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनचा या दरम्यान 4.94 इतका इकॉनमी रेट राहिलाय. तर 33.5 इतका एव्हरेज राहिलाय. तसेच अश्विनने 65 टी 20 सामन्यांमध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान टीम इंडिया आता विंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया वेस्टइंडिज विरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. मात्र तोवर टीम इंडियाला विश्रांतीच आहे. या दरम्यानच्या काळात मोकळ्या वेळेत अश्विन टीएनपीएल स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे अश्विन आयपीएलनंतर टीएनपीएल या स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.