मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यासाठी आता मोजून 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी कडवी झुंज होणार आहे. दोन्ही संघांनी या महामुकाबल्यासाठी जोरदार तयारी केली आहे. नेट्समध्ये दररोज सरावही सुरु आहे. हा महाअंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल इथे रंगणार आहे. या सर्व घडामोडींदरम्यान एका स्टार आणि दिग्गज खेळाडूने मोठा धमाका केलाय. या दिग्गज क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे टीमचं टेन्शन वाढलंय.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
डेव्हिड वॉर्नर याच्याकडून निवृत्ती जाहीर
Some shock news from the Australia camp on Saturday ? #WTC23 | Details ?https://t.co/Vwhrx6HcQg
— ICC (@ICC) June 3, 2023
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2024 मध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. वॉर्नर आपला अखेरचा कसोटी सामना 2024 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. वॉर्नर याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि एशेज सीरिज खेळणार आहे.
वॉर्नरची कसोटी कारकीर्द स्वप्नवत अशी राहिली आहे. वॉर्नरने आतापर्यं 102 कसोटी सामने खेळले आहेत. वॉर्नरने या 102 सामन्यांमध्ये 8 हजार 158 धावा केल्या आहेत. वॉर्नरने या दरम्यान 3 द्विशतकं, 25 शतकं आणि 34 अर्धशतकं ठोकली आहेत. वॉर्नरची 335 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.