लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यासाठी आता 4 दिवस राहिले आहेत. टेस्ट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कडवी झुंज होणार आहे. या महामुकाबला 7 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 11 जूनपर्यंत हा सामना चालणार आहे. तर 12 जून राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल इथे खेळवला जाणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया या द ओव्हल मैदानात मागील सर्व वाईट घटना विसरून नव्याने सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. ऑस्ट्रेलियाची इंग्लंडमधील 140 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात द ओव्हल या मैदानातील आकडेवारी वाईट आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत इंग्लंडमधील या मैदानात एकूण 38 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 7 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 18.42 टक्के इतकी आहे. ऑस्ट्रेलियाची ही विजयी टक्केवारी इंग्लंडमधील सर्वात वाईट अशी आहे.
ऑस्ट्रेलियाला द ओव्हलमध्ये गेल्या 50 वर्षात फक्त 2 वेळाच जिंकता आलंय. तर टीम इंडियाचीही इथे ओव्हलमधील कामगिरी चांगली आहे, अशातला भाग नाही. टीम इंडियाने द ओव्हल इथे एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 14 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. 5 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तर 7 सामने अनिर्णित राखण्यात यश आलंय.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोघांसाठी ही आकडेवारी चिंताजनक अशी आहे. त्यामुळे ही आकडेवारी मागे टाकत या महाअंतिम सामन्यात कोण मुसंडी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ