लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिलं सत्र टीम इंडियाच्या नावावर राहिलं. पहिल्या दिवशी 3 विकेट घेणाऱ्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात 4 विकेट्स घेत कांगारुंना बॅकफुटवर ढकललं. या 4 पैकी पहिल्या 3 विकेट्समध्ये शतकवीर ट्रेव्हिस हेड-स्मिथ आणि कॅमरुन ग्रीन या तिघांच्या विकेटचा समावेश आहे. तर यानंतर अक्षर पटेल याने मिचेल स्टार्कला शानदार फिल्डिंगच्या जोरावर रन आऊट केलं. या रन आऊटचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
अक्षर पटेल टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. अक्षर मोहम्मद शमी याच्या जागेवर काही वेळेसाठी सब्टीट्युड म्हणून मैदानात आला. ऑस्ट्रेलियाचा 6 बाद 402 असा स्कोअर झाला होता. या दरम्यान स्टार्कने मिडऑफच्या दिशेने फटका मारत एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेल तिथे उभा होता. अक्षर बॉलच्या दिशेने धावत गेला. एका हाताने बॉल कलेक्ट केला. हवेत डाईव्ह मारत बॉल स्टंपच्या दिशेने फेकला. अक्षरने कडक थ्रो केला. थ्रो जाऊन स्टंपवर लागला. मिचेल अशाप्रकारे रन आऊट झाला.
मिचेल स्टार्क रन आऊट
दरम्यान मोहम्मद सिराज याने सामन्यातील दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी फोडली. सिराजने ट्रेव्हिस हेड याला 163 धावांवर विकेटकीपर केएस भरत याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर मोहम्मद शमी याने कॅमरुन ग्रीन याला स्लिपमध्ये शुबमन गिल याच्या हाती 6 धावांवर कॅच आऊट केलं.
टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 2 विकेट्स मिळाले. मात्र स्टीव्हन स्मिथ नावाची डोकेदुखी मैदानात होतीच. आता याचा कार्यक्रम केला तो शार्दुल ठाकुर याने. शार्दुलने स्टीव्हनला 121 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.