लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यात पहिल्या दिवशी अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जोरदार मुसंडी मारली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटपट आऊट केलं. मोहम्मद सिराज याने ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ ही जोडी फोडून काढली. त्यानंतर सिराज, शार्दुल, शमी आणि जडेजा या चौकडीने धमाका केला. सिराजने 4, शमी-शार्दुलने प्रत्येकी 2 आणि रविंद्र जडेजा याने 1 विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 469 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडिया बॅटिंगसाठी मैदानात आली. गोलंदाजांच्या कामगिरीनंतर फलंदाजांवर मोठी जबाबदारी होती. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीकडून चांगल्या आणि मोठ्या खेळीची आशा अपेक्षा होती. मात्र ज्याची भीती तेच झालं. रोहित शर्मा 15 धावांवर आऊट झाला. तर त्यापाठोपाठ शुबमन गिल याने 13 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आयपीएलमध्ये हिरो ठरलेल्या शुबमनने घोर निराशा केली.
सलामी जोडी झटपट आऊट झाल्याने टीम इंडिया आता अडचणीच सापडली आहे. सलामी जोडी आऊट झाल्याने टीम इंडियाची 2 बाद 30 अशी स्थिती झाली. तर दुसऱ्या सत्रातील खेळ संपला तोवर भारताने 10 ओव्हरमध्ये 2 बाद 37 धावा केल्या. तिसऱ्या सत्रात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या जोडीकडून अपेक्षा होत्या. मात्र या दोघांनीही निराशा केली. पुजारा आणि विराट दोघेही प्रत्येकी 14 धावा करुन माघारी परतले.
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. हेडने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या. स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.
या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या. उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.