WTC Final मध्ये टीम इंडिया हरणार राहुल द्रविडला आधीच माहित होतं?, सामन्यानंतर धक्कादायक खुलासा!

| Updated on: Jun 11, 2023 | 7:37 PM

या सामन्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य फलंदाज अपयशी ठरले पण मुख्य कोच राहलु द्रविडने पराभवाचं खापर फलंदाजांवर नाहीतर या खेळाडूंवर फोडलं आहे.

WTC Final मध्ये टीम इंडिया हरणार राहुल द्रविडला आधीच माहित होतं?, सामन्यानंतर धक्कादायक खुलासा!
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनलमध्ये 209 धावांनी पराभव केलाय. टीम इंडियाची ढेपाळलेली बॅटींग या पराभवाला कारणीभूत ठरली.  दोन्ही डावांमध्ये सलामीवार आणि मधल्या फळीतील बॅटर्सने नांगी टाकली याचाच फटका संघाला बसला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघ आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य फलंदाज अपयशी ठरले पण मुख्य कोच राहलु द्रविडने पराभवाचं खापर फलंदाजांवर नाहीतर या खेळाडूंवर फोडलं आहे. सामना संपल्यावर द्रविडने स्टार स्पोर्टशी बोलत होते.

काय म्हणाला राहुल द्रविड?

ओव्हलचं विकेट पाहता 300 धावा बरोबर होत्या, मात्र पहिल्या डावातच 469 धावा झाल्या. पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात गोलंदाजांनी 187 धावा जास्त दिल्या त्या संघाला महागात पडल्या. ट्रॅव्हिस हेडने फलंदाजीला आल्यावर त्याने वेगाने धावा काढल्या त्यावर गोलंदाजांना नियंत्रण ठेवता आलं नाही. चौथ्या दिवशी फलंदाजांनी खराब फटके मारून आपल्या विकेट गमावल्याचं राहुल द्रविड म्हणाला.

एकंदिरत राहुलच्या मते पहिल्या दिवशी सामना टीम इंडियाच्या हातातून निसटल होता. संघाला त्यानंतर कमबॅक करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.  त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा यानेही पराभवानंतर आपलं मत मांडलं.

दोन फायनल खेळणे ही आमच्यासाठी चांगली कामगिरी आहे. पण आम्हाला आणखी पुढे जायचंय. आम्ही गेल्या दोन वर्षात इथवर येण्यासाठी खूप काही केलंय. ते तुम्ही नाकारु शकत नाहीत. सर्वांनी प्रयत्न केले. दुर्दैवाने आम्ही जिंकलो नसल्याची प्रतिक्रिया रोहित शर्मा याने दिली.

WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.