मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून रोजी लंडनमधील द ओव्हल इथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळण्याची सलग दुसरी वेळ आहे. टीम इंडिया 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाली होती. त्यामुळे टीम इंडिया यंदा कांगारुंविरुद्ध आणखी जोर लावून मैदानात विजयासाठी उतरणार आहे.
टीम इंडियाच्या गोटात 5 मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी दोघांना 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याचा अनुभव आहे. तर तिघांची यंदा wtc final साठी पहिल्यांदाच निवड झाली आहे. या 5 पैकी 3 जण मुख्य संघात आहेत. तर उर्विरत दोघे हे राखीव खेळाडूंपैकी आहेत.
टीम इंडियाच्या गोटात एकूण 5 खेळाडू आहेत. यामध्ये स्वत: कॅप्टन रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे दोघे 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध महाअंतिम सामना खेळले आहेत. तर शार्दुल ठाकूर यांची यंदा पहिल्यांदाच निवड झाली आहे. तर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल हे राखीव खेळाडू आहेत. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांना अनुभव आहे. त्यामुळे कांगारुंसमोर इतर तिघांपेक्षा या दोघांचं आव्हान असणार आहे. रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या महाअंतिम सामन्यात 34 आणि 30 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे याने 49 आणि 15 धावा केल्या होत्या.
शार्दुल ठाकूर याची यंदा पहिल्यांदाच निवड झाली आहे. मात्र शार्दुल ठाकूर याच्यात बॉलिंग आणि बॅटिंगने निर्णायक क्षणी धमाका करण्याची क्षमता आहे. त्यामुळे शार्दुलला हलक्यात घेणं कांगारुंना महागात पडू शकतं. सूर्यकुमार यादव हा टी 20 क्रिकेटचा किंग आहे. मात्र त्याला कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्यात त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता तशी कमी आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.