मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमानंतर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे पूर्णपणे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलकडे लागून राहिलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला हा 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल इथे आयोजित करण्यात आला आहे. तब्बल 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 2 फायनलिस्ट टीम निश्चित झाल्यात. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप महाअंतिम सामन्यामध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे. सामना त्रयस्थ ठिकाणी असल्याने दोन्ही संघांना होम कंडीशनचा फायदा होणार नाही. त्यामुळे खरी रंगत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान फायनलाधी टीम इंडियात एक मोठा बदल झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी टीम इंडिया नव्या जर्सीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध उतरणार आहे. टीम इंडियाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. आदिदासने टीम इंडियाच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटसाठी 3 वेगवेगळ्या जर्सी लॉन्च केल्या आहेत. अदिदासने या जर्सीचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अदिदास टीम इंडियाचा अधिकृत कीट स्पॉन्सर आहे.
आदिदासने शेअर केलेल्या व्हीडिओत वानखेडे स्टेडियमची ड्रोन दृश्य आहेत. या दृश्यांमध्ये स्टेडियममधून वरच्या दिशेने 3 जर्सी वर येताना दिसत आहेत. हा व्हीडिओ क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. तसेज व्हीडिओ व्हायरलही झाला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच आदिदास टीम इंडियाचा अधिकृत किट स्पॉन्सर असेल, याची घोषणा बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विटद्वारे केली होती. टीम इंडिया आणि किलर जीन्स यांच्यात किट स्पॉन्सर म्हणून मोठ्या कालावधीसाठी करार झाला होता. टीम इंडियाने एमपीएलससोबत 2023 पर्यंत किट स्पॉन्सर म्हणून करार केला होता. मात्र एमपीएलकडून मध्येच हा करार मोडण्यात आला. त्यामुळे 5 महिन्यांसाठी बीसीसीआयने किलर जीन्ससह करार केला.
टीम इंडियाची नवी जर्सी
An iconic moment, An iconic stadium
Introducing the new team India Jersey's #adidasIndia #adidasteamindiajersey#adidasXBCCI @bcci pic.twitter.com/CeaAf57hbd— Adidas India (@adidasindiaoffi) June 1, 2023
किलर जीन्ससोबतचा करार हा 31 मे रोजी पर्यंत होता. त्यानंतर आता आज म्हणजेच 1 जून आदिदास किट स्पॉन्सर आहे. त्यामुळे आदिदासने टीम इंडियाच्या जर्सीचा नवा लुक क्रिकेट चाहत्यांसमोर आणला आहे. दरम्यान त्याआधी टीम इंडियाचे खेळाडू हे नेट्स प्रॅक्टीसमध्ये आदिदासच्या स्पोर्ट्सवेअरमध्ये दिसले होते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.