मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023 महामुकाबल्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. क्रिकेट चाहते या महाअंतिम सामन्याची आवर्जून वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टेस्ट वर्ल्ड कपसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलमध्ये 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस असणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. टीममध्ये एका घातक खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या गोटात झिंबाब्वेचे माजी कर्णधार एंडी फ्लॉवर यांनी एन्ट्री झाली आहे. एंडी फ्लॉवर यांची ऑस्ट्रेलिया टीममध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एंडी फ्लॉवर याआधी इंग्लंडचे क्रिकेट टीमचे कोच राहिले आहेत. त्यामुळे फ्लॉवर यांना इंग्लंडमधील खडानखडा माहिती आहे. ऑस्ट्रेलियाला फ्लॉवर यांच्या या अनुभवाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये फायदा होईल.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने सोमवारी द ओव्हलमध्ये जोरदार सराव केला. या दरम्यान फ्लॉवर मैदानात हजर होते. फ्लॉवर यांनी सरावादरम्यान ऑस्ट्रेलिया खेळाडूंना मार्गदर्शन केलं.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.