WTC Final 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिप फेरीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. कसोटी क्रिकेटमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये झाली होती. त्यावेळी किवींनी भारतीय संघावर विजय मिळवत नाव कोरलं होतं. यंदा भारताने परत एकदा अंतिम फेरी गाठली. तुम्हाला माहिती आहे का अंतिम सामना केव्हा, कुठे आणि केव्हा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या मोसमाचा अंतिम सामनाही इंग्लंडमध्ये होणार आहे. आयसीसीने यासाठी लंडनच्या केनिंग्टन ओव्हलची निवड केली आहे. आयसीसीला लॉर्ड्सवर त्याचे आयोजन करायचं असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाईल. त्याचवेळी, आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. कारण त्यावेळी इंग्लंडमधील पावसाने हजेरी लावू शकतो म्हणून हा दिवस राखीव ठेवला आहे.
WTC फायनल सुरू होण्याची वेळ काय असेल? स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होईल, परंतु त्यावेळी भारतामध्ये दुपारी 3.30 वाजता असेल. दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे.
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी 2023 फायनल थेट पाहू शकता, तर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी हॉटस्टारवर लॉग इन करावे लागेल. कारण ICC इव्हेंटचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.