मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनलमध्ये 2023 टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या फायनल सामन्यात आर. अश्विन याचा संघात समावेश केला गेला नाही. अश्विनला न घेतल्यामुळे टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर क्रिकेट जगतातील बड्या खेळांडूंनी प्रश्न उपस्थित करत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अशातच अश्विनला फायनल सामन्यात खेळवणार नाही हे आधीच माहिती होतं की काय असं वाटत आहे. कारण या खेळाडूने जो संभाव्या सांगितला होता तोच संघ आज ओव्हलच्या मैदानात दिसला.
या खेळाडूने दुपारी 12.11 वाजता संभाव्य प्लेइंग 11 कशी असणार याबाबत पोस्ट केलं होतं. त्यामध्ये, फायनल सामन्यासाठी टीम इंडिया अशी निवडली जाईल, असं सांगितलं होतं. सध्या ओव्हलवरील वातावरण हे ढगाळ आणि थंड आहे. मात्र जसजसा दिवस जाईल तसं वातावरण चांगलं होईल, असंही त्याने म्हटलं होतं.
टॉस झाल्यावर या खेळाडूने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे संघ निवडला गेला. त्यानंतर सुरूवातील टीम इंडिया गोलंदाजी करत असताना वातावरण ढगाळ राहिलं त्यानंतर ढग गेले आणि ऊन पडलं तिथून स्मिथ आणि हेडने संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला.
I feel this will be the XI Team India will opt for
Rohit
Shubman
Pujara
Kohli
Rahane
Jadeja
BHARAT
SHARDUL
UMESH
Shami
SirajIt’s cloudy and cold at the moment though it’s gonna get better as the day and test progresses ?#WTCFinal #INDvsAUS
— DK (@DineshKarthik) June 7, 2023
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.