मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 फायनल टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे इंग्लंडमधील द ओव्हल क्रिकेट ग्राउंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याची ही दुसरी वेळ आहेच. भारताला 2021 मध्ये न्यूझीलंडकडून अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यंदा टीम इंडियाला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला एका मागोमाग एक झटके लागले आहेत.
जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर, यासारखे अनुभवी खेळाडू हे दुखापतीने त्रस्त आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हा दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे केएलच्या जागी कुणाला संधी द्यायची असा सवाल टीम मॅनेजमेंट समोर उभा ठाकला आहे. अशातच एका स्टार खेळाडूला संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
केएल राहुल याच्या जागी इशान किशन याला टीम इंडियात संधी देण्यात यावी, अशी मागणी मादी क्रिकेटर अमोल मुजूमदार याने केली आहे. केएल राहुलच्या जागी इशानला संधी देण्यात यावी, कारण तो सध्या चमकदार कामगिरी करतोय, असं मुजूमदार इएसपीएन क्रिकएन्फोसोबत बोलताना म्हणाला. अजूनही केएलची जागा घेणाऱ्या खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट केएल याच्या जागी कुणाला संधी देणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.