टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या आणि विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं. भारताचा डाव सुरु झाला आणि तीन चेंडूनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना सुरु होण्यासाठी वेळ लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचं टार्गेट बदलण्यात आलं. भारताला 8 षटकात 78 धावा करण्याचं आव्हान देण्यात आलं. भारताने हे आव्हान 6.3 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. यात यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळी केली. 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. या धावांसह यशस्वी जयस्वालने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2024 या वर्षात 1000 धावा पूर्ण करणार जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच एका वर्षात 1000 धावा करणारा तरुण फलंदाजही ठरला आहे. त्याने विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी 22 व्या वर्षी अशी कामगिरी केली होती. कोहलीने 2010 साली आणि दिनेश कार्तिकने 2007 साली या विक्रम नोंदवला होता. आता 22 व्या वर्षी यशस्वी जयस्वालने ही कामगिरी केली आहे. पण या विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. त्याने 1992 मध्ये 19 वर्षांचा असताना एका वर्षात 1000 धाव केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने 19 व्या वर्षी, रवि शास्त्रीने 21 व्या वर्षी, विनोद कांबळीने 21 व्या वर्षी, सचिन तेंडुलकरने 21 व्या वर्षी, दिनेश कार्तिकने 22 व्या वर्षी, विराट कोहलीने 22 व्या वर्षी आणि यशस्वी जयस्वालने 22 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.