Yashasvi Jaiswal Hundread : यशस्वी जयस्वाल याने मुंबईविरूद्ध खणखणीत शतक करत रचला इतिहास

| Updated on: Apr 30, 2023 | 11:04 PM

पहिल्या ओव्हरपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या यशस्वीने 53 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आहे. मुंबईच्या एकाही बॉलरला त्याने सोडलं नाही. जोफ्रा आर्चर यालाही त्याने कडक सिक्सर मारत पिसलंय.

Yashasvi Jaiswal Hundread : यशस्वी जयस्वाल याने मुंबईविरूद्ध खणखणीत शतक करत रचला इतिहास
Follow us on

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामधील चालू असलेल्या सामन्यामध्ये राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने दमदार शतक केलं आहे. पहिल्या ओव्हरपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या यशस्वीने 53 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आहे. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरं शतक असून आयपीएलमधील 78 वं शतक केलं आहे.

 

यशस्वीने 62 बॉलमध्ये 124 धावांची धुंवाधार खेळी केली आहे. मुंबईच्या एकाही बॉलरला त्याने सोडलं नाही. जोफ्रा आर्चर यालाही त्याने कडक सिक्सर मारत पिसलंय. यशस्वीच्या शतकाच्या जोरावर राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचं लक्ष्य मुंबई इंडिअन्ससमोर ठेवलं आहे.

याआधी सनरायझर्स हैदराबादसाठी हॅरी ब्रूक आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यंकटेश अय्यर या दोघांनी शतके केली आहेत. जयस्वालच्या शतकी खेळीमुळे राजस्थानची धावसंख्या 200 धावांच्या जवळ पोहोचली आहे.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने 212 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 124 धावा केल्या. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. जोस बटलरने 18 धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ संजू सॅमसन (14 धावा) आणि जेसन होल्डर (11 धावा) करून बाद झाले. मुंबईकडून अर्शद खानने 3 आणि पियुष चावलाने 2 बळी घेतले. जोफ्रा आर्चर आणि रिले मेरेडिथ यांनी 1 विकेट मिळवली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान