राजकोट | मुंबईकर युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध तडाखेदार खेळी करत दीडशतक ठोकलं आहे. यशस्वीने 192 बॉलमध्ये या 150 धावांचा टप्पा गाठला आहे. यशस्वीने या खेळीत 11 चौकार आणि 7 सिक्सच्या मदतीने ही दीडशतकी खेळी केली. यशस्वीचं या दरम्यान 78.12 चं स्ट्राईक रेट राहिलं. यशस्वी तिसऱ्या दिवशी शतकी खेळीनंतर त्रास जाणवत असल्याने रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता. मात्र त्यानंतर चौथ्या दिवशी शुबमन गिल आऊट झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल मैदानात आला आणि फटकेबाजीला सुरुवात करत 150 धावा केल्या.
यशस्वीने इंग्लंड विरुद्ध 50, 100 आणि 150 धावांचा टप्पा वेगाने गाठला. यशस्वीने अर्धशतकासाठी 80 चेंडूंचा सामना केला. यशस्वीने सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर यशस्वीने अर्धशतक ते शतकापर्यंतचा प्रवास हा 42 चेंडूंच्या मदतीने पूर्ण केला. यशस्वीने 122 बॉलमध्ये शतक झळकावलं. यशस्वीच्या शतकी खेळीत 5 सिक्स आणि 9 चौकारांचा समावेश होता.
यशस्वीने शतक ठोकल्यानंतर डेव्हिड वॉर्नर स्टाईलने जल्लोष केला. यशस्वीने हवेत उडी घेत बॅट उंचावली आणि शतकी आनंद साजरा केला. मात्र त्यानंतर यशस्वीला त्रास जाणवू लागला. यशस्वी मैदानातच आडवा पडला. मेडीकल टीम मैदानात आली. त्यानंतर यशस्वी काही बॉल खेळला. मात्र त्यानंतर त्रास सहन न झाल्याने अखेर यशस्वी मैदानाबाहेर गेला. यशस्वी 104 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला.
यशस्वी रिटायर्ड हर्ट झाल्याने तिसऱ्या दिवशी कुलदीप यादव मैदानात आला. कुलदीप आणि शुबमन गिल ही जोडी तिसऱ्या दिवशी नाबाद परतली आणि चौथ्या दिवसाची सुरुवात केली. चौथ्या दिवसाची या जोडीने जोरात सुरुवात करत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र एका क्षणी गडबड झाल्याने शुबमन गिल नॉन स्ट्राईक एंडवर 91 धावांवर रन आऊट झाला. त्यानंतर यशस्वी मैदानात आला. यशस्वीने त्यानंतर हल्लाबोल करत लंचब्रेकनंतर दीडशतकी खेळी केली. त्यानंतर आता यशस्वीकडून क्रिकेट चाहत्यांना त्याच्या कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं दुसरं द्विशतक अपेक्षित आहे.
यशस्वीच्या 150 धावा आणि जल्लोष
The run-scoring juggernaut continues for Yashasvi Jaiswal! 👏 👏
He moves past 1⃣5⃣0⃣! 💪 💪
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/6rkwQsoR7k
— BCCI (@BCCI) February 18, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.