राजकोट | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात झंझावाती शतक ठोकलं आहे. यशस्वीने या शतकादरम्यान तोडफोड बॅटिंग करत मैदानाच चौफेर फटकेबाजी केली. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढला. यशस्वीने इंग्लंड विरुद्धच त्यांच्याच पद्धतीने बेझबॉल स्टाईलने सेंच्यूरी पूर्ण केली. यशस्वीने अर्धशतकापासून ते शतकापर्यंतचा टप्पा हा अवघ्या 42 चेंडूत पूर्ण केला.
यशस्वी जयस्वाल याचं इंग्लंड विरुद्धच्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील हे दुसरं शतक ठरलं. यशस्वीने 80 बॉलमध्ये अर्धशतक तर 122 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. यशस्वीने या शतकी खेळीत 9 चौकार आणि 5 सिक्स लगावले. यशस्वीने 81.97 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावलं. यशस्वीला दुसऱ्या बाजूने शुबमन गिल यानेही चांगली साथ दिली. त्यामुळेच टीम इंडियाला इंग्लंडवर दबाव तयार करता आला.
दरम्यान यशस्वीच्या शतकानंतर टीम इंडियाला झटका लागला. यशस्वीला शतकानंतर त्रास जाणवू लागला. यशस्वीला क्रॅम्प आल्याने त्याला त्रास झाला. यशस्वी मैदानात पडला. त्यानंतर यशस्वी उभा राहून पुन्हा खेळू लागला. तर दुसऱ्या बाजूला यशस्वीला पाहून कुजबूज सुरु होती. मात्र अखेर यशस्वीला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं.यशस्वी 133 बॉलमध्ये 104 धावा करुन माघारी परतला.
यशस्वी जयस्वालच्या शतकानंतर ड्रेसिंग रुमममध्ये जल्लोष
A leap of joy to celebrate his second century of the series 🙌
Well played, Yashasvi Jaiswal 👏👏#TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pdlPhn5e3N
— BCCI (@BCCI) February 17, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.