IND vs AFG | टीम इंडियाला धक्का, हा खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर

| Updated on: Jan 11, 2024 | 7:32 PM

India vs Afghanistan 1st T20I | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून मोठा खेळाडू हा बाहेर पडला आहे.

IND vs AFG | टीम इंडियाला धक्का, हा खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर
Follow us on

मोहाली | टीम इंडियाने 2024 या वर्षातील पहिलाच टॉस जिंकला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. खेळपट्टीचा अंदाज घेऊन कॅप्टन रोहितने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं कोच राहुल द्रविड यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

विराट पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याने त्याच्या जागी कुणाला घ्यायची, अशी डोकेदुखी कॅप्टन रोहित शर्मासमोर होती. त्यात आता आणखी भर पडली आहे. पहिल्या सामन्यातून टीम इंडियाचा स्टार आणि युवा ओपनर यशस्वी जयस्वाल हा बाहेर पडला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

राहुल द्रविड याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितसोबत यशस्वी जयस्वाल ओपनिंग करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र सामन्याआधी यशस्वी जयस्वाल याला दुखापत झाल्याने तो निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयने सांगितलं. यशस्वीच्या उजव्या मांडीला दुखापत असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही.

यशस्वी जयस्वाल दुखापतीचा शिकार

दरम्यान यशस्वीसह कुलदीप यादव, संजू सॅमसन आणि आवेश खान यांचाही प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता रोहितसह शुबमन गिल ओपनिंग करणार आहे.

रोहितची 14 महिन्यांनी एन्ट्री

रोहित शर्माने या सामन्यानिमित्ताने टी 20 टीम इंडियात कॅप्टन्सीसह 14 महिन्यांनी कमबॅक केलं आहे. रोहित अखेरचा टी 20 सामना हा आयसीसी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. तो सामाना सेमी फायनलचा होता.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.