मुंबई | टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने आपल्या नावानुसार पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. यशस्वीने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये गरुड झेप घेतली आहे. आयसीसीने बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी क्रमवारी जाहीर केली. यशस्वीला या रँकिंगमध्ये जबरा फायदा झाला आहे. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत सलग द्विशतक ठोकल्यानं त्याला रँकिंगमध्ये बंपर रिर्टन मिळालं आहे.
यशस्वी जयस्वाल याने कसोटी क्रमवारीत थेट 14 स्थानांची लाँग जंप घेतली आहे. यशस्वी यासह 29 वरुन थेट 15 व्या स्थानी येऊन ठेपला आहे. यशस्वी जयस्वाल याच्या नावावर 699 रेटिंग्स आहेत. तर टॉप 15 मध्ये यशस्वी व्यतिरिक्त टीम इंडियाच्या 3 फलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हे तिघे आहेत. विराटने आपलं 7 वं स्थान कायम राखलं आहे. रोहित शर्मा 1 स्थानाची झेप घेत 12 व्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. तर ऋषभ पंतची 12 वरुन 14 स्थानी घसरण झाली आहे.
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग 2 द्विशतक झळकावली आहेत. यशस्वीने विशाखापट्टणम आणि त्यानंतर राजकोटमध्ये सलग द्विशतकी खेळी केली. यशस्वीने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 209 धावांची खेळी केली. तर त्यानंतर राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात नाबाद 214 धावांची विस्फोटक खेळी केली. यशस्वीने या खेळीत विक्रमी 12 सिक्स ठोकले होते. यशस्वीने यासह कसोटीतील एका डावात सर्वाधिक 12 सिक्सच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. तसेच यशस्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा नंबर 1 फलंदाज ठरला आहे.
‘यशस्वी’ भव
India players on the rise in the latest ICC Men’s Player Rankings after massive England victory 👏https://t.co/xaBGlJu9Bt
— ICC (@ICC) February 21, 2024
दरम्यना आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये न्यूझीलंडच्या केन विलियमनस याने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे. केनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत शतकी खेळी केली होती. केनच्या नावावर ताज्या आकडेवारीनुसार 893 रेटिंग्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी स्टीव्हन स्मिथ हा 818 रेटिंग्ससह विराजमान आहे. तिसऱ्या स्थानी डॅरेल मिचेल आहे. डॅरेलच्या नावावर 780 रेटिंग्स आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम 768 रेटिंग्सह चौथ्या आणि इंग्लंडचा जो रुट 766 रेटिंग्सह पाचव्या क्रमांकावर आहे.