हैदराबाद | टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी 246 धावांवर ऑलआऊट केल्यानंतर जोरदार सुरुवात केली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने दणक्यात सुरुवात केलीय. त्यामुळे टेस्ट मॅच सुरु आहे की वनडे असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला. यशस्वीने आक्रमकपणे फटकेबाजी केली. यशस्वीने चौफेर फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन रोहितने यशस्वीला स्ट्राईक मिळवून दिली. यशस्वीने अशाप्रकारे भारतातील पहिलं आणि एकूण दुसरं कसोटी अर्धशतक झळकावलं.
यशस्वीने अवघ्या 47 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीने या दरम्यान 7 कडक चौकार आणि 2 खणखणीत षटकार लगावले. यशस्वीने 108.51 च्या सरासरीने ही फिफ्टी पूर्ण केली. या दरम्यान दोघांनी टीम इंडियाला एक आश्वासक अशी सुरुवात मिळवून दिली. यशस्वी आणि रोहित या दोघांनी 80 धावांची सलामी भागदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा टीम इंडियाच्या डावातील 13 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मोठा फटका मारण्यच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला.
जॅक लीच याने आपल्या बॉलिंगवर कॅप्टन बेन स्टोक्सच्या हाती रोहितला कॅच आऊट केलं. रोहित शर्माने 27 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीने आणि 88.89 च्या स्ट्राईक रेटने 24 धावांची खेळी केली.
टीम इंडियाची यशस्वी सुरुवात
He has raced past FIFTY! 👏 👏
This has been a blitz of a knock from @ybj_19 to notch up his 2⃣nd Test half-century ⚡️ ⚡️
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Pail01CRRw
— BCCI (@BCCI) January 25, 2024
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.