“ही आजकालची पोरं…”, तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर रोहित शर्माची पोस्ट व्हायरल

| Updated on: Feb 19, 2024 | 3:27 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना गमवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. दिग्गज खेळाडूंची उणीव असूनही युवा खेळाडूंना चांगली कामगिरी केली आहे. आता कर्णधार रोहित शर्मा याची इंस्टा पोस्ट व्हायरल होत आहे.

ही आजकालची पोरं..., तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर रोहित शर्माची पोस्ट व्हायरल
तिसऱ्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर रोहित शर्माच्या पोस्टने लक्ष वेधलं, काय म्हणाला एकदा वाचा
Follow us on

मुंबई : भारताने राजकोट येथे खेळलेल्या तिसरा कसोटी सामन्यात इंग्लंडवर मोठा विजय मिळवला. इंग्लंडला 434 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. यात रोहित शर्माने यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने ‘ही आजकालचं पोरं’ असं पोस्ट लिहिली आहे . या पोस्टच्या माध्यमातून कर्णधार रोहित शर्मा याने तीन खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. या तिन्ही खेळाडूंनी राजकोट कसोटीत चांगली कामगिरी केली होती. रोहित शर्माने पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये ध्रुव जुरेल स्लाइट मारत बेन स्टोक्सला आऊट करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल धावताना दिसत आहेत. त्यावर ही आजकालची पोरं असं लिहून टाळ्या वाजवतानाचा इमोजी टाकला आहे.

राजकोट कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने द्विशतक ठोकलं होतं. यापूर्वी विशाखापट्टणमन कसोटीत यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं होतं. कसोटी कारकिर्दितलं यशस्वी जयस्वालचं दुसरं द्विशतक आहे. जयस्वालने 236 चेंडूत 214 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 12 षटकार मारले होते. यशस्वीसोबत पदार्पणाच्या सामन्यात सरफराज खान यानेही लक्ष वेधून घेतलं. दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात 68 आणि दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा केल्या.

सरफराजसोबत ध्रुव जुरेल यानेही राजकोट कसोटीतून पदार्पण केलं. पहिल्या डावात 46 धावा केल्या. पण विकेटकिपिंगमुळे उपस्थितांचं मन जिंकलं. दुसऱ्या डावात बेन डकेटला रनआऊट केलं. तसेच दुसऱ्या डावात फिरकीपटूंसमोर चांगली विकेटकिपींग केली आणि चांगले झेल घेतले.

तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तगडा फायदा झाला आहे. तिसऱ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता चौथा कसोटी सामना जिंकल्यास थेट पहिलं स्थान गाठणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. झारखंडमधील रांची येथील जेएससीए मैदानावर हा सामना होणार आहे.