Video : युवराज सिंग टॉयलेटमधून आला अन् तसाच….भज्जीची जाम सटकली

| Updated on: Mar 08, 2023 | 7:31 PM

युवराजने टॉयलेटमधून येतो आणि हात न धुताच त्याला रंग लावत आहे. यामुळे हरभजन काहीसा संतापला.

Video : युवराज सिंग टॉयलेटमधून आला अन् तसाच....भज्जीची जाम सटकली
Follow us on

मुंबई : यंदा होळीचा सणाचा आनंद भारतातच नाहीतर जगभरातील लोकांनी लुटलेला पाहायला मिळाला. भारतीय क्रिकेटपटूंदेखील होळी साजरी केली. भारताचे माजी खेळाडू युवराज सिंग आणि हरभजन सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. युवराजने टॉयलेटमधून येतो आणि हात न धुताच त्याला रंग लावत आहे. यामुळे हरभजन काहीसा संतापला. हा व्हिडीओ युवराज सिंग याने ट्विटरवर शेअर केलाय.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

युवराज आणि हरभजन दोघेही एकमेकांना रंग लावतात. त्याआधी टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर युवराज थेट हरभजनकडे येतो. तो हरभजनला मिठी मारतो आणि त्याला रंग लावू लागतो. यानंतर हरभजनच्या लक्षात येतं की युवीने हात धुतलेले नव्हते. तो त्याला बोलतो की, तू टॉयलेटला गेलास, हात धुतलास की नाहीस. हा व्हिडीओ शेअर करताना युवराजने, “बुरा ना मानो होली है, असं कॅप्शन दिलं आहे.

 

युवराज आणि हरभजनच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांना एकत्र पाहून यूजर्स त्यांच्या बाँडिंगचे कौतुक केलं आहे. काहींनी दोघांना भाऊ म्हटलं आहे. एका यूजरने कमेंट केली की, “युवराज आणि हरभजन तुम्ही दोघेही अप्रतिम मनोरंजन करणारे आहात.

दरम्यान, हरभजन सिंह हा लवकरच लिजेंड्स लीग क्रिकेट (LLAC) मध्ये दिसणार आहे. तो भारत महाराजा संघाचा भाग आहे. ज्याचे नेतृत्व गौतम गंभीर करणार आहे. हरभजनशिवाय मुरली विजय आणि स्टुअर्ट बनीसारखे खेळाडूही या संघात आहेत. भारत महाराजांचा पहिला सामना आशिया लायन्सशी होणार आहे. हा सामना 10 मार्च रोजी होणार आहे.