‘असे हाल करेन की, सारी दुनिया थुकेल’, कपिल देवबाबत युवराज सिंगच्या वडिलांचं धक्कादायक विधान

| Updated on: Sep 02, 2024 | 8:30 PM

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. खासकरून धोनीबाबतच्या विधानांवरून त्यांची चर्चा होत असते. यावेळी योगराज सिंग यांनी धोनीसोबत कपिल देववरही निशाणा साधला आहे. योगराज सिंग यांनी कपिल देव आणि धोनीवर गंभीर आरोप केले आहेत.

असे हाल करेन की, सारी दुनिया थुकेल, कपिल देवबाबत युवराज सिंगच्या वडिलांचं धक्कादायक विधान
Follow us on

युवराज सिंगच्या वडीलांनी एखादं विधान केलं की त्या बातम्या चर्चेत असतात. कारण वर्ल्डकप विजेत्या युवराज सिंगच्या वडीलही क्रिकेटपटू राहिले आहेत. युवराज सिंगला क्रिकेटपटू बनविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. त्या मेहनतीच्या जोरावर युवराज सिंगने टीम इंडियात नावलौकिक मिळवला. तसेच टीम इंडियाला विजय मिळवून दिला. आता योगराज सिंग यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. त्यांनी मुलाखतीत पुन्हा एकदा कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीत त्यांनी कपिल देव यांच्यावर आरोप केला की, त्याच्यामुळेच मला संघातून काढण्यात आलं होतं. कपिल देव आणि योगराज सिंग यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. योगराज सिंग टीम इंडियासाठी फक्त एक कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले आहेत. योगराज सिंग यांच्या मते, ही घटना 1981 सालची आहे. कपिल देव त्यांना प्रतिस्पर्धी मानत होता. याच कारणामुळे संघातून काढलं होतं.

योगराज सिंगने मुलाखतीत सांगितलं की, ‘त्याला आता सारासार विचार करण्याची गरज आहे. त्याने सांगितलं होतं की, मी लोकांना दाखवू इच्छितो की योगराज काय माणूस आहे? ज्याला तुम्ही खाली खेचलंत. आज सर्व जग त्याच्या पायाखाली आहे. लोकं सलाम ठोकतात. पण ज्या लोकांनी वाईट केलं त्यापैकी कोणाला कँसर, कोणाचं घर फुटलंय, तर कोणाचा मुलगा राहिला नाही. तुम्ही समजून जा की मी कोणाबाबत बोलत आहे. तो सर्वकालिन महान कर्णधार कपिल देव आहे. त्याला मी सांगितलं होत की असे हाल करून सोडेन की सारं जग थुकेल. आज युवराज सिंगजवळ 13 ट्रॉफी आहेत आणि त्याच्याकडे फक्त एक वर्ल्डकप आहे.’

योगराज सिंगने यावेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरही निशाणा साधला. त्यांनी सांगितलं की, ‘त्याला आयुष्यभर माफ करणार नाही. त्याने स्वतचा चेहरा आरश्यात पाहायला हवा. तो खूप मोठा क्रिकेटर आहे. पण माझ्या मुलाविरुद्ध जे काही केलं ते आता सर्वांसमोर येत आहे. त्याला आयुष्यात कधी माफ केलं जाऊ शकत नाही. मी आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत. पहिलं तर जे लोक माझ्याशी चुकीचं वागले त्यांना माफ केलं नाही. दुसरं म्हणजे मी त्यांना आयुष्यात जवळ घेतलं नाही. मग ते माझ्या कुटुंबातील सदस्य असो की माझी मुलं.’