टी20 वर्ल्डकपसाठी युवराज सिंगचा प्लेइंग इलेव्हनसाठी खास फॉर्म्युला, रोहित शर्माची डोकेदुखी होणार कमी!

| Updated on: May 22, 2024 | 5:21 PM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. आता मैदानात कोणते 11 खेळाडू घेऊन रोहित शर्मा उतरणार याची उत्सुकता लागून आहे. 5 जूनला भारताचा सामना आयर्लंडशी होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सिक्सर किंग युवराज सिंगने प्लेइंग इलेव्हन जारी केली आहे. त्याने कोणाकोणाला स्थान दिलं ते जाणून घेऊयात

टी20 वर्ल्डकपसाठी युवराज सिंगचा प्लेइंग इलेव्हनसाठी खास फॉर्म्युला, रोहित शर्माची डोकेदुखी होणार कमी!
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज झाली आहे. गेल्या 11 वर्षांचा आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर होणार का? अशी आस क्रीडाप्रेमींना लागू आहे. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने या स्पर्धेसाठी टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग इलेव्हन जारी केली आहे. युवराज सिंग टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा ब्रँड एम्बेसेडर आहे. यावेळी युवराज सिंग ने आयसीसीसोबत झालेल्या मुलाखतीत टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत सांगितलं. युवराज सिंगने प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पांड्याला स्थान दिलं आहे. युवराज सिंगने सांगितलं की, “हार्दिकने आयपीएलमध्ये काही खास केलं नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे की, टी20 वर्ल्डकपमध्ये तो काही खास करेल. त्याची गोलंदाजीची क्षमता आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी महत्त्वाचा असतील.” इतकंच काय तर रोहित शर्मासोबत ओपनिंगला यशस्वी जयस्वालने उतरावं असंही त्याने पुढे सांगितलं.

“मला वाटते की रोहित आणि यशस्वीने टी20 वर्ल्डकपसाठी ओपनिंग करावी. विराट कोहली तीन नंबरला उतरावा. तीन नंबर ही कोहलीची जागा आहे. चार नंबरवर सूर्यकुमार यादवला पाठवू शकता. मी उजवं आणि डावखुरं कॉम्बिनेशनसोबत जाईन. या कॉम्बिनेशनमुळे विरोधी संघाला गोलंदाजी करणं कठीण जातं.” असं युवराज सिंगने सांगितलं. विकेटकीपर बॅट्समन म्हणून संजू सॅमसन की ऋषभ पंत या प्रश्नावरही त्याने उत्तर दिलं. “मी ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देईल. संजूही चांगल्या फॉर्मात आहे. पण ऋषभ पंत डावखुरा आहे. माझ्या मते ऋषभमध्ये भारताला सामना जिंकवण्याची क्षमता जास्त आहे. त्याने भुतकाळात करून दाखवलं आहे. असा खेळाडू मोठ्या पातळीवर मॅच विनर ठरू शकतो.”, असं युवराज सिंगने पुढे सांगितलं.

“युझवेंद्र चहलला टिममध्ये पाहून बरं वाटलं. कारण तो खरंच चांगली गोलंदाजी करत आहे. टी20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या भागात खेळपट्टी संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही पर्याय संघात असणं गरजेचं आहे. आपल्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग आहे. त्यामुळे वास्तवात हा मजबूत संघ आहे. पण आम्हाला हे सिद्ध करून दाखवावं लागेल.”, असंही युवराज सिंग पुढे म्हणाला.

युवराज सिंगने निवडलेली संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह