‘मी तुझ्यासोबत..’, युवराज सिंगने सांगितला पाठलाग करत बसमध्ये चढलेल्या अभिनेत्रीचा किस्सा

| Updated on: Sep 26, 2024 | 6:15 PM

युवराज सिंग भारतीय क्रिकेट इतिहासातील मोठं नाव..टी20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या युवराज सिंगचे कोट्यवधी चाहते आहेत. त्याने टी20 वर्ल्डकपमध्ये मारलेले सहा षटकार आजही स्मरणात आहेत. असं असताना युवराज सिंगने पॉडकास्टमध्ये एका अभिनेत्रीचा किस्सा सांगितला आहे.

मी तुझ्यासोबत..,   युवराज सिंगने सांगितला पाठलाग करत बसमध्ये चढलेल्या अभिनेत्रीचा किस्सा
Follow us on

सिक्सर किंग युवराज सिंगने केलेल्या एका खुलाशामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. कारण त्यांनी सांगितलेला किस्सा काही वेगळाच आहे. ऑस्ट्रेलियात एका अभिनेत्रीने पाठलाग केल्याचं युवराज सिंगने सांगितलं. पण युवराज सिंगने त्या अभिनेत्रीचं नाव काही जाहीर केलं नाही. त्या अभिनेत्रीचं नाव गुलदस्त्यात ठेवल्याने जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने अंदाज बांधत आहे. पण युवराज सिंगच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. युवराज सिंगने संगितलं की, ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी एका अभिनेत्रीसोबत डेट करत होतो. मी तिची नाव घेणार नाही. ती एडिलेडमध्ये शूटिंग करत होती. मी तिला सांगितलं की, बघ मला फक्त काही वेळासाठी भेट कारण मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फोकस करायचं हे. पण ती माझा पाठलाग करत कॅनबराच्या बसमध्ये आली.”

” मी तिला विचारलं की तू इथे काय करत आहेस. तर ती बोलली की मी तुझ्यासोबत वेळ घालवू इच्छिते. मी तिला सांगितलं की, तुला तुझ्या करिअरवर लक्ष दिलं पाहिजे आणि मला यावेळेस माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे.’, असंही युवराज सिंगने सांगितलं. हेजलसोबत लग्न करण्यापूर्वी युवराज सिंगचं नाव किम शर्मा, दीपिका पादुकोण, नेहा धुपिया आणि रिया सेनसोबत जोडलं गेलं आहे. युवराज सिंगचं 2007 च्या सुरुवातीलाच किम शर्मासोबत ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर काही काळ दीपिका पादुकोणकोसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

युवराज सिंगने याच पॉडकास्टमध्ये तिन्ही फॉर्मेटसाठी बेस्ट खेळाडू म्हणून विराट कोहलीचं नाव घेतलं. पण जेव्हा फक्त टी20 बाबत सांगितलं गेलं तेव्हा त्याने रोहित शर्मावर डाव टाकला. युवराज सिंगला विचारलं गेलं की, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीपैकी कोणत्या खेळाडूवर डाव लावशील. तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता टी20 साठी रोहित शर्माची निवड केली. रोहित शर्मा एक चांगला कर्णधार आहे. तसेच सामन्याचं चित्र कधीही पालटू शकतो. त्यामुळे रोहित शर्मा पहिली पसंत असल्याचं त्याने सांगितलं. याशिवाय कसोटीसाठी युवराज सिंगने जो रुटची बेस्ट प्लेयर म्हणून निवड केली.

दरम्यान, युवराज सिंगने बॉर्डर गावस्कर मालिकेतील विजेत्याबाबतही भाकित केलं. भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ही मालिका भारतीय संघ 3-2 ने जिंकेल असं सांगितलं. मागच्या दोन दौऱ्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं आहे.