IPL 2022, PBKS vs LSG, Purple Cap : युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा बादशाह, टॉप फाईव्हमध्ये पंजाब-राजस्थानचा एकही खेळाडू नाही

| Updated on: Apr 30, 2022 | 10:10 AM

पर्पल कॅपमधील टॉपचे पाच खेळाडू पाहिल्यास पहिल्या स्थानी युझवेंद्र चहल आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत.

IPL 2022, PBKS vs LSG, Purple Cap : युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा बादशाह, टॉप फाईव्हमध्ये पंजाब-राजस्थानचा एकही खेळाडू नाही
युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप कायम
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. या टेबलमध्ये रोज सामन्यानंतर बदल होत असतो. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब (PBKS) विरुद्द लखनौ सुपर जायंट्सने (LSG) वीस धावांनी विजय मिळवलाय. लखनौच्या संघाने गोलंदाजांच्या दमावर विजय मिळवल्यामुळे लखनौ आता पॉईंट्स टेबलमध्ये आगेकूच केलीय. लखनौच्या 154 धाावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला वीस ओवरमध्ये 133 धावाच बनवता आल्या. पंजाबच्या जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 28 चेंडूत 32 धावा काढल्या. यात त्याने 5 चौकार मारले. तर मयंक अग्रवालने 17 चेंडूत 25 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर ऋषी धवनने 22 चेंडूत 21 धावा काढल्या. त्यात तीन चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, अखेर पंजाबला टार्गेट पूर्ण करता आलं नाही आणि 20 धावांनी लखनौचा सुपर विजय झाला. यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय ते पाहुया.

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपमधील टॉपचे पाच खेळाडू पाहिल्यास पहिल्या स्थानी युझवेंद्र चहल आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी कुलदीप यादव असून त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी उमरान मलिक असून त्याने या सीजनमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत. तर चौथ्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने देखील 15 विकेट घेतल्या आहेत.पाचव्या स्थानी उमेश यादव असून त्याने 14 विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा
24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक
22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

डी कॉकचं अर्धशतक हुकलं

काल लखनौला पहिला झटका केएल काहुलचा बसला. त्यानंतर डी कॉक चांगला खेळला मात्र थोड्यावरुन त्याचं अर्धशतक हुकलं. संदीप शर्माने जितेश शर्माच्या हाती डी कॉकला झेलबाद केलं. डी कॉकने बाद होण्याआधी 37 चेंडूत 46 धावा काढल्या.