Video : युझवेंद्र चहलची इंग्लंडमध्ये भेदक गोलंदाजी, अर्धा संघ एकट्याने पाठवला तंबूत

| Updated on: Sep 10, 2024 | 8:59 PM

टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये कहर केला आहे. सध्या युझवेंद्र चहल इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. या स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. अवघ्या 45 धावात निम्मा संघ तंबूत पाठवला आहे.

Video : युझवेंद्र चहलची इंग्लंडमध्ये भेदक गोलंदाजी, अर्धा संघ एकट्याने पाठवला तंबूत
Follow us on

टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीची धार इंग्लंडमध्ये अनुभवायला मिळाली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर युझवेंद्र चहलची संघात निवड झालेली नाही. त्यामुळे चहल इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थेम्प्टनशायर संघातून खेळत आहे. 9 सप्टेंबरला नॉर्थम्म्पटनशायर आणि डर्बीशायर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात डर्बीशायरने प्रथम फलंदाजी केली. मात्र युझवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. टप्प्याटप्याने संघावर विकेट गमवण्याची वेळ आली. 99 धावांवर 4 विकेट पडल्या होत्या.  150 धावांवर 4 विकेट अशी स्थिती होती. पण पुढच्या 15 धावांमध्ये सहा विकेट गमवल्या. संघाकडून लुईस रीसने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या. तर वेन मॅडसेनने 47 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. संपूर्ण संघ अवघ्या 165 धावांवरच तंबूत परतला. यात युझवेंद्र चहलने 45 धावा देत पाच गडी बाद केले.

युझवेंद्र चहलने टीम इंडियासाठी टी20 आणि वनडे सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर बरेच विक्रम नोंदवले गेले आहेत. पण युझवेंद्र चहलने मागच्या एका वर्षात टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं होतं. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही स्थान मिळालं नाही. युझवेंद्र चहलने भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याची काउंटीमधील कामगिरी पाहता. चहल 11 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. हरयाणा संघाकडून खेळणअयाची शक्यता आहे. दुसरीकडे, काउंटी क्रिकेटच्या जोरावर त्याला बांगलादेशविरुद्धच्या टी20 संघात स्थान मिळतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नॉर्थेम्प्टनशायरकडून पृथ्वी शॉही मैदानात उतरला आहे. मात्र पहिल्या डावात फ्लॉप ठरला. फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र फक्त 2 धावा करून तंबूत परतला. त्याने 8 चेंडूचा सामना केला आणि बाद झाला. आात दुसऱ्या डावात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पृथ्वी शॉने आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे.