माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री सागरिका यांनी शिर्डीत हजेरी लावली. साई मंदिरात जाऊन समाधीचं दर्शन घेतलं. यावळी त्याने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. झहीर खान म्हणाला की, ‘बऱ्याच दिवसांनी शिर्डीला आलो तरी श्रद्धा ही असतेच ना. श्रीरामपूरचा असल्याने लहानपणीच्याही आठवणी आहेत. शिर्डीचा कायापालट झाला आहे. हे सर्व काही माझ्या समोरच बघितलं आहे. वडील पण सारखे यायचे. सागरिका तर येतंच असते. फारच चांगलं आहे.” दरम्यान, सोशल मिडीयावर व्हायरल झालेली राजस्थानमधील सुशिला मिना हि सध्या चर्चेत आहे. तिची बॉलिंग अॅक्शन हुबेहूब झहीर खानसारखी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही तिच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यावर जहिर खानने देखील तिची स्तुती करत भारतात क्रिकेटच्या बाबतीत खुप टँलेंट असल्याच म्हंटलं. खेळाडुंसाठी उत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली.दरम्यान दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने जहीर खान आणि अभिनेत्री सागरीका घाटगे या दांपत्याचं सत्कार करण्यात आला.
46 वर्षीय झहीर खान भारतासाठी 2000 ते 2014 दरम्यान खेळला. यावेळी त्याने भारतासाठी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या. 2011 वनडे वर्ल्डकप संघात झहीर खान होता. या स्पर्धेत झहीर खानने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. झहीर खानने 2017 मध्ये सागरिका घाटगेशी विवाह केला. या दोघांची भेट एका पार्टीत झाली होती. त्यानंतर भेटीगाठी होत प्रेम फुलत गेलं आणि मग लग्नबंधनात अडकले. या दोघांना पहिल्यांदा युवराज सिंहच्या लग्नात एकत्र पाहिलं गेलं होतं. सागरिकाने चक दे इंडिया, फॉक्स, मिले ना मिले हम आणि रस सारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे.
झहीर खान सध्या आयपीएल 2025 स्पर्धेच्या रणनितीसाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्स सोडत त्याने लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेन्टॉर आणि मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सने केएल राहुलला रिलीज केल्यानंतर कर्णधार कोण असेल याबाबत अजून तरी काही स्पष्ट केलं नाही. पण आयपीएल लिलावात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर 27.50 कोटींची बोली लावून सर्वांना धक्का दिला. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतच्या गळ्यात पडू शकते. दुसरीकडे, संघाला पहिलं जेतेपद मिळवून देण्यासाठी झहीर खानही प्रयत्नशील आहे.