Yusuf Pathan | 6,6,6,6,6,6,6,6,6, ठोक ठोक ठोकला! यूसुफ पठाण याच्याकडून गोलंदाजाची धुलाई

| Updated on: Jul 28, 2023 | 10:34 PM

Yusuf Pathan In T 10 2023 | यूसुफ पठाणे याने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलमध्ये प्रतिस्पर्धी संघाला दणका देत विस्फोटक खेळी केली.

Yusuf Pathan | 6,6,6,6,6,6,6,6,6, ठोक ठोक ठोकला! यूसुफ पठाण याच्याकडून गोलंदाजाची धुलाई
Follow us on

हरारे | टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर आणि वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खेळाडू यूसुफ पठाण याने आपल्या तुफान फटकेबाजीने एक काळ गाजवला. यूसुफच्या त्याच तोडफोड स्टाईल बॅटिंगची झलक क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. झिंबाब्वेत सध्या झिम एफ्रो टी 10 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील क्वालिफायर 1 सामन्यात डरबन कलंदर्स विरुद्ध जोहान्सबर्ग बफेलोज आमनेसामने होते. यूसुफ पठाणने या सामन्यात जोहान्सबर्ग बफेलोज टीमकडून खेळताना डरबन कलंदर्स विरुद्ध 26 बॉलमध्ये 80 धावांची नाबाद वादळी खेळी केली. यूसुफच्या या खेळीच्या जोरावर जोहान्सबर्गने फायनलमध्ये एन्ट्री केली.

सामना जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये पोहचणार होती. त्यामुळे लढाई ही आरपारची होती. या आरपारच्या सामन्यात जोहान्सबर्ग टीम अडचणीत होती. 141 धावांच्या आव्हानाचं पाठलाग करताना जोहान्सबर्गने झटपट विकेट्स गमावल्या. तेव्हा यूसुफने मैदानात येत संकटमोचकाची भूमिका बजावली. यूसुफने मैदानात येताच गोलंदाजांना ठोकायला सुरुवात केली आणि विजय मिळवून दिला.

हे सुद्धा वाचा

यूसुफने या 80 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 9 षटकार ठोकले. युसुफने 307.69 च्या स्ट्राईकने या धावा ठोकल्या. यूसुफने या खेळीदरम्यान मैदानात चौफेर फटेकबाजी केली. फटकेबाजी पाहून काही वर्षांपूर्वीचा यूसुफ पठाण आठवला. यूसुफने या स्पर्धेत याआधीही छोटी पण वेगवान खेळी केली. यूसफने एका सामन्यात 21 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. तसेच त्याआधी 16 चेंडूत 32 धावा केल्या.

यूसुफची फटकेबाजी पाहा व्हीडिओ

दरम्यान आता जोहान्सबर्गचा सामना अंतिम सामन्यात क्वालिफायर 2 विजेता संघाविरुद्ध होणार आहे. या अंतिम सामना शनिवारी 29 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

तर क्वालिफायर 1 मध्ये डरबन कलंदर्स पराभूत झाल्यानंतरही त्यांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 2 मध्ये कलंदर्सचा सामना हा एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीम विरुद्ध होणार आहे. एलिमिनेटरमध्ये केप टाऊन विरुद्ध हरारे हरिकेन्स आमनेसामने आहेत.

डरबन कलंदर्स प्लेईंग इलेव्हन | क्रेग एर्विन (कॅप्टन), टीम सेफर्ट (विकेटकीपर), आंद्रे फ्लेचर, मिर्झा ताहिर बेग, आसिफ अली, निक वेल्च, जॉर्ज लिंडे, ब्रॅड इव्हान्स, तेंडाई चतारा, डॅरिन डुपाव्हिलन आणि मोहम्मद अमीर.

जोहान्सबर्ग बफेलोज प्लेईंग इलेव्हन | मोहम्मद हाफीज (कर्णधार), टॉम बँटन (विकेटकीपर), विल स्मीड, रवी बोपारा, युसूफ पठाण, वेसली माधेवरे, वेलिंग्टन मसाकादझा, नूर अहमद, ज्युनियर डाला, ब्लेसिंग मुझाराबानी आणि व्हिक्टर न्याउची.