टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारी अफगाणिस्तान क्रिकेट टीम सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. अफगाणिस्तानची या दौऱ्यातील सुरुवात पराभवाने झाली. झिंबाब्वेने 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानला पराभूत करत विजयी सलामी दिली. अफगाणिस्तानने त्यानंतर सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला मंगळवार 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.
उभयसंघातील पहिला सामना हा हरारे स्पोर्ट्स कल्ब येथे खेळवण्यात येणार आहे. क्रेग एर्विन हा झिंबाब्वेचं नेतृत्व करणार आहे. तर हशमतुल्लाह शाहिदीकडे अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामना भारतात टीव्हीवर कुठेच पाहायला मिळणार नाही. मात्र मोबाईलवर फॅन कोड एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान अफगाणिस्तानने पहिल्या सामन्याआधी कोच जोनाथन ट्रॉट याच्या मार्गदर्शनात जोरदार सराव केला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सरावाचे फोटो पोस्ट केले आहेत.
T20Is ✅
ODI mode 🔛#AfghanAtalan have hit the ground running as they gear up for the first ODI against Zimbabwe, scheduled to be held tomorrow in Harare. 👏#ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/hIx72yOz8F— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 16, 2024
झिम्बाब्वे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, ताशिंगा मुसेकिवा, टिनोटेंडा मापोसा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, व्हिक्टर न्याउची, वेलिंग्टन मसाकादझा, ट्रेवर ग्वांडू, जॉयलॉर्ड गुम्बी, बेन कुरान आणि न्यूमन न्याम्हुरी
अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रहमत शाह, सेदिकुल्ला अटल, दरविश रसूल, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि एएम गझनफर, नांगेलिया खरोटे, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, अब्दुल मलिक, बिलाल सामी आणि नवी झद्रान