टीम इंडिया युवा शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच टी 20i मालिका खेळणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 5 टी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला शनिवार 6 जुलै पासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड झिंबाब्वे विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. सिकंदर रझा झिंबाब्वेचं नेतृत्व करणार आहे. हा पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सलामीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते, हे जाणून घेऊयात.
कॅप्टन शुबमन गिल हा स्वत: ओपनर आहे. त्यामुळे शुबमन ओपनिंग करणार हे निश्चित आहे. तसेच शुबमनने सामन्याच्या पूर्वसंध्येला आपला ओपनर पार्टनर कोण असणार? हे पण जाहीर केलंय. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा अभिषेक शर्मा ओपनिंग करणार असल्याचं शुबमन गिलने सांगितलं. त्यामुळे अभिषेक शर्मा याचं टी20i क्रिकेटमधून पदार्पण होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
साई सुदर्शनला तिसऱ्या स्थानासाठी संधी मिळू शकते. रियान परागला चौथ्या स्थानी वर्णी लागू शकते.तर विकेटकीपर म्हणून एका जागेसाठी दोघांमध्ये चुरस आहे. जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा आहे. मात्र ध्रुवच्या तुलनेत जितेशला टी20 क्रिकेटचा अनुभव आहे. त्यामुळे जितेशला संधी मिळू शकते. रिंकू सिंह फिनिशर म्हणून त्याची जागा निश्चित मानली जात आहे. तसेच बॉलिंगची जबाबदारी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला मिळू शकते. तसेच रवी बिश्नोई त्याची साथ देऊ शकतो. तर आवेश खान, खलील अहमद आणि हर्षित राणा या तिघांना वेगवान गोलंदाजाची जबाबदारी मिळू शकते.
टीम इंडियाची संभावित प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (कॅप्टन) , अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रियान पराग, जितेश शर्मा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, आवेश खान, खलील अहमद, हर्षित राणा आणि रवी बिश्नोई.
झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुशार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.
झिंबाब्वे क्रिकेट टीम: सिकंदर रझा (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.