कॅप्टन सिकंदर रझा याने अखेरच्या क्षणी केलेल्या स्फोटक खेळीमुळे झिंबाब्वेने चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियासमोर 153 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिंबाब्वेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. कॅप्टन सिकंदर आणि इतर काही फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे यजमानांना इंडियासमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलंय. आता टीम इंडियाचे फलंदाज हे आव्हान पूर्ण करतात की झिंबाब्वेचे गोलंदाज करो या मरो सामन्यात या धावांचा यशस्वी बचाव करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या झिंबाब्वेची शानदार सुरुवात झाली. वेस्ली मधेवेरे आणि तादिवानाशे मारुमणी या दोघांनी 63 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत झिंबाब्वेला ठराविक अंतराने झटके देत बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे झिंबाब्वेच्या खेळीला ब्रेक लागला. मात्र कॅप्टन सिकंदर रझाने विस्फोटक खेळी करत झिंबाब्वेला 150 पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली.
सिकंदर रझाने झिंबाब्वेकडून सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. रझाने 28 बॉलमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार ठोकले. तादिवानाशे मारुमणी याने 32 धावांची खेळी केली. वेस्ली मधेवेरेने 25 धावांचं योगदान दिलं. तर डायन मायर्स 12 धावांवर आऊट झाला. या चौघांव्यतिरिक्त झिंबाब्वेच्या एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून खलील अहमद याने 2 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे या चौकडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियासमोर 153 धावांचं आव्हान
Zimbabwe post 152/7 in the first innings.
Time for #TeamIndia‘s chase 🙌
Scorecard ▶️ https://t.co/AaZlvFY7x7#ZIMvIND pic.twitter.com/924TLgTAGN
— BCCI (@BCCI) July 13, 2024
झिंबाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कॅप्टन), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.