टीम इंडियाने झिंबाब्वेवर चौथ्या टी 20i सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. झिंबाब्वेने टीम इंडियाला विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाच्या सलामी जोडीनेच हे आव्हान 15.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 156 धावा केल्या. कॅप्टन शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने विस्फोटक बॅटिंग करत टीम इंडियाला एकतर्फी विजय मिळवून दिला. शुबमन गिल याने 58 तर यशस्वी जयस्वालने नाबाद 93 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.
यशस्वी आणि शुबमन या दोघांनी सुरुवातीपासूनच दे दणादण फटकेबाजी केली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. शुबमन गिलयाने 39 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने 175.47 च्या स्ट्राईक रेटने 53 बॉलमध्ये 2 सिक्स आणि तब्बल 13 चौकारांच्य मदतीने नाबाद 93 धावांची तोडू खेळी केली. टीम इंडियाच्या या सलामी जोडीने झिंबाब्वेच्या गोलंदाजांना झोडून काढला. या दोघांसमोर झिंबाब्वेचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. एकूण 6 जणांनी बॉलिंग केली, मात्र एकालाही ही जोडी फोडण्यात यश आलं नाही.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेच्या सलामी जोडीने 63 धावांची भागीदारी करत शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने झिंबाब्वेला धक्के दिले. मात्र कॅप्टन सिकंदर रझा याने 46 धावांची झंझावाती खेळी करत झिंबाब्वेला 150 पोहचवण्या मोठी भूमिका बजावली. झिंबाब्वेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. टीम इंडियाकडून खलील अहमद याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. आता या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी 14 जुलै रोजी होणार आहे.
टीम इंडिया ‘यशस्वी’
For his opening brilliance of 9⃣3⃣* off just 5⃣3⃣ deliveries, @ybj_19 is named the Player of the Match 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/AaZlvFY7x7#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/yqiiMsFAgF
— BCCI (@BCCI) July 13, 2024
झिंबाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कॅप्टन), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.