ZIM vs IND: “शुबमन गिल Selfish”, यशस्वीचं शतक अधुर राहिल्याने नेटकऱ्यांची टीका

| Updated on: Jul 13, 2024 | 10:01 PM

Shubman Gill Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 156 धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवून दिला.

ZIM vs IND: शुबमन गिल Selfish, यशस्वीचं शतक अधुर राहिल्याने नेटकऱ्यांची टीका
shubman gill
Follow us on

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने शुबमन गिल याच्या नेतृत्वात झिंबाब्वेवर चौथ्या टी 20 सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. झिंबाब्वेने टीम इंडियाला विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान टीम इंडियाच्या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. कॅप्टन शुबमन आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने 28 बॉल राखून टीम इंडियाला रुबाबदार विजय मिळवून दिला. टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये बिनबाद 156 धावा केल्या.

शुबमन गिल याने टीम इंडियासाठी 39 बॉलमध्ये 58 धावांची नाबाद खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने 93 धावांची विस्फोटक खेळी केली. यशस्वीने 53 बॉलमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नॉट आऊट 93 रन्स केल्या. यशस्वीचं शतक अवघ्या 7 धावांमुळे अधुरं राहिलं. मात्र यशस्वीचं शतक अधुरं राहण्यासाठी कॅप्टन शुबमन जबाबदार असल्याचा दावा, नेटकरी करत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी शुबमनला निशाण्यावर घेतलं आहे.

यशस्वी सहज शतक करु शकला असता, मात्र शुबमनकडून यशस्वीला योग्य वेळी स्ट्राईक न मिळाल्याने तो मागे राहिला, असा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे. शुबमन गिलला नेटकरी आता स्वार्थी म्हणून ट्रोल करत आहेत. शुबमनमुळेच यशस्वी शतकापासून दूर राहिल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. तसेच शुबमनबाबत अनेक सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहे.

शुबमन गिल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

झिंबाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कॅप्टन), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.