टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध एकूण 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सिकंदर रझा याच्याकडे झिंबाब्वेची सूत्रं आहेत. या मालिकेतील पाचही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या मालिकेला अवघे काही दिवस बाकी असताना टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी संघामध्ये 3 बदल केले आहेत. संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या तिघांच्या जागी अनुक्रमे साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा समावेश केला आहे. आता टीम इंडियात ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा 2 विकेटकीपर झाले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? अशी चर्चा रंगली आहे.
ध्रुव जुरेल टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळला आहे. मात्र त्याला टी 20चा अनुभव नाही. तसेच ध्रुवने आयपीएलमधील 14 सामन्यांमध्ये 195 धावा केल्या आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला टी 20I क्रिकेटचा तसा अनुभव नाही. तर ध्रुवच्या तुलनेत अमरावतीकर जितेश शर्मा हा अनुभवी आहे. ध्रुवने 38 टी 20 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 439 धावा केल्या आहेत. तर जितेश शर्माने 120 टी 20 सामन्यांमध्ये 2 हजार 490 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन शुबमन गिल दोघांपैकी विकेटकीपर म्हणून कोणत्या नावाा पसंती देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दोघांपैकी कुणाला संधी?
Jitesh Sharma or Dhruv Jurel. Who will be India’s Wicket-Keeper for 1st & 2nd T20Is?🤔 pic.twitter.com/xrICiiNqoE
— CricketGully (@thecricketgully) July 2, 2024
झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.
झिंबाब्वे क्रिकेट टीम: रझा सिकंदर (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.