ZIM vs IND Head To Head: टीम इंडियाची झिंबाब्वे विरुद्धची कामगिरी, यजमान संघाने जिंकलेत इतके सामने

| Updated on: Jul 06, 2024 | 12:17 AM

Zimbabwe vs India T20i Head To Head Records: टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात शनिवार 6 जुलैपासून झिंबाब्वे विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.

ZIM vs IND Head To Head: टीम इंडियाची झिंबाब्वे विरुद्धची कामगिरी, यजमान संघाने जिंकलेत इतके सामने
india vs zimbabwe
Follow us on

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.मालिकेतील पहिला सामना शनिवारी 6 जुलै रोजी होणार आहे. शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर सिकंदर रझाकडे झिंबाब्वेची धुरा आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही पहिल्यांदाच अनुभवी खेळाडूंशिवाय खेळणार आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनात टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेच्या निमित्ताने टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील हेड टु हेड रेकॉर्ड्स जाणून घेऊयात.

आकडे कुणाच्या बाजूने?

झिंबाब्वेला कायम लिंबुटिंबू म्हणून गणलं गेलंय. मात्र या झिंब्बावेने टीम इंडियाला गेल्या 5 टी 20i सामन्यामध्ये जोरदार टक्कर दिली आहे. झिंबाब्वेने गेल्या 5 पैकी 2 सामन्यात टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 3 सामने जिंकले आहेत. तसेच उभयसंघात एकूण 8 वेळा आमनेसामने भिडले आहेत. टीम इंडियाने या 8 पैकी 6 सामने जिंकलेत. तर झिंबाब्वेने 2 वेळा बाजी मारली आहे.

टीम इंडियाची हरारेमधील कामगिरी

टीम इंडियाने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये एकूण 7 टी20i सामने खेळले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 5 सामने जिंकले आहेत. टीम इंडिया-झिंबाब्वे यांच्यात 2016 साली अखेरीस इथे सामना झाला होता. तेव्हा टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. टीम इंडियाला तेव्हा पहिल्या सामन्यात 2 धावांनी पराभूत व्हाव लागलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना 10 विकेट्सने जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात 3 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली.

तसेच टीम इंडियाला इथे 2 वेळा पराभूत व्हाव लागलंय. येथे एकूण 41 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. झिंबाब्वेला खेळलेल्या 38 पैकी 9 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा 23 तर नंतर फलंदाजी करणारी टीम 18 वेळा विजयी झाली आहे.

झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.

झिंबाब्वे क्रिकेट टीम: सिकंदर रझा (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.