एका बाजूला आयपीएल 2025 मेगा ऑक्शन सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला कायम कमी गृहीत धरण्यात आलेल्या झिंबाब्वे क्रिकेट टीमने धमाका केला आहे. झिंबाब्वेने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली आहे. झिंबाब्वेने पाकिस्तानचा डीएलएसनुसार 80 धावांनी धुव्वा उडवला आहे. झिंबाब्वे 40.2 ओव्हरमध्ये 201 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे पाकिस्तानला तुलनेने माफक आव्हान मिळालं. मात्र पाकिस्तानची विजयी धावांचा पाठलाग करताना चांगली घसरगुंडी झाली. पाकिस्तानची स्थिती 18.5 ओव्हरनंतर 56 वर 6 आऊट अशी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने 2 धावा जोडल्या. पाकिस्तानच्या 60 धावा झाल्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. मात्र त्यांनतर पावसामुळे पूर्ण सामना होऊ शकला नाही. परिणामी सामन्याचा निकाल हा डीएलएनुसार लावण्यात आला. झिंबाब्वेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
पाकिस्तानकडून एकालाही 20 धावाही करता आल्या नाहीत. पाकिस्तानसाठी कॅप्टन मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक 19 धावा केल्या. कामरान घुमाल 17 आणि सॅम अय्युब याने 11 धावा केल्या.इतर तिघांना दुहेरी आकडीही गाठता आला नाही. तर एक आला तसाच गेला. झिंबाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी, सीन विल्यम्स आणि सिकंदर रझा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेसाठी नवव्या स्थानी आलेल्या रिचर्ड नगारावा याने सर्वाधिक 48 धावा केल्या. सिकंदर रझा याने 39 धावा केल्या. तर इतर चौघांनी छोटेखानी खेळी केली. त्यामुळे झिंबाब्वेला ऑलआऊट होईपर्यंत 200 पार मजल मारता आली. पाकिस्तानकडून आघा सलमान आणि फैसल अक्रम या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर आमेर जमाल, हसनैन आणि हरीस रौफ या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तान की टीम 9 साल बाद जिम्बाब्वे से वनडे मैच हारी है. आखिरी बार 2015 में जिम्बाब्वे ने पाकिस्तान को हराया था. 2020 में दोनों टीमों के बीच एक वनडे मुकाबला टाई रहा था. पाकिस्तान की टीम जिम्बाब्वे में 4 मैच हार चुकी है. वहीं बुलावायो के मैदान पर पाकिस्तान पहली बार हारा है.
दरम्यान झिंबाब्वेने यासह पाकिस्तानवर 9 वर्षांनी एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. झिंबाब्वेने याआधी पाकिस्तानवर 2015 साली विजय मिळवला होता. तसेच 2020 मध्ये उभयसंघातील एकदिवसीय सामना हा बरोबरीत राहिला होता.
झिंबाब्वेचा 80 धावांनी विजय
Zimbabwe win the first ODI by 80 runs on DLS method.#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/LVPqGY8C2U
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 24, 2024
झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन : क्रेग एर्विन (कर्णधार), तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), जॉयलॉर्ड गुम्बी, डिओन मायर्स, सीन विल्यम्स, सिकंदर रझा, ब्रायन बेनेट, ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि ट्रेव्हर ग्वांडू.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, हसीबुल्ला खान, आगा सलमान, इरफान खान, आमेर जमाल, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन आणि फैसल अक्रम.