T20 World Cup 2024 आधी आणखी एका खेळाडूच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का

| Updated on: May 12, 2024 | 10:02 PM

Cricket Retirement : स्टार ऑलराउंडरने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कोण आहे तो?

T20 World Cup 2024 आधी आणखी एका खेळाडूच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का
t20i world cup 2024
Image Credit source: Icc X account
Follow us on

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज कॉलिन मुनरो याने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत न्यूझीलंड संघात निवड न झाल्याने क्रिकेटरने टोकाचा निर्णय घेत कारकीर्दीला ब्रेक लावला. त्यानंतर आता आणखी एका स्टार क्रिकेटरने 18 वर्षांच्या कारकीर्द थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे. बांगलादेश विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील 5 सामन्यांची मालिका पूर्ण झाली आहे. बांगलादेशने ही मालिका 4-1 ने जिंकली. झिंबाब्वेने अखेरचा सामना जिंकत शेवट गोड केला. मात्र त्यानंतर झिब्बांवेला मोठा झटका लागला. झिंबाब्वेचा स्टार ऑलराउंडर आणि माजी कर्णधार सीन विलियम्स याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, सीन विलियम्सने बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर या झटपट फॉर्मेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सीनने बांगलादेश विरुद्धच्या या मालिकेतील एकूण 2 सामनेच खेळले. सीन पहिल्या सामन्या झिरोवर आऊट झाला. सीनला पाचव्या सामन्यात बॅटिंगची संधीच मिळाली नाही.

18 वर्षांच्या टी 20 कारकीर्दीला ब्रेक

झिंबाब्वेला बांगलादेश विरुद्ध मालिका जिंकता आली नाही. मात्र झिंबाब्वेने अखेरचा सामना जिंकून सीनला विजयी निरोप दिला. झिंबाब्वेसाठी कार्यरत असलेल्या बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझला माहिती दिली. त्यानुसार, “सीनने पाचव्या सामन्यानंतर निवृत्ती घेत असल्याचं सहकाऱ्यांना सांगितलं”. सीनने घेतल्या निवृत्तीमळे त्याच्या चाहत्यांना धक्का लागला आहे. मात्र सीन वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सीन विल्यमसचा टी 20 क्रिकेटला रामराम

सीन विल्यम्सची टी 20 कारकीर्द

सीन विल्यम्सने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 25 फेब्रुवारी 2005 रोजी टी 20 पदार्पण केलं. सीनने तेव्हापासून ते आतापर्यंत 81 सामन्यांमध्ये 11 अर्धशतकांसह 1 हजार 691 धावा केल्या. तसेच 48 विकेट्सही घेतल्या. दरम्यान जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या या 20 संघांमध्ये झिंबाब्वेचा समावेश नाही. झिंबाब्वे वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत अपयशी ठरल्याने त्यांना तिकीट मिळवता आलं नाही.