IND vs ZIM : टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील दुसऱ्या टी-20 साठी लावा ही ड्रीम 11

| Updated on: Jul 07, 2024 | 4:38 PM

टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना काही वेळात सुरू होत आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. आजच्या सामन्यात गिलने टीममध्ये बदल केलाय, आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

IND vs ZIM : टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील दुसऱ्या टी-20 साठी लावा ही ड्रीम 11
IND VS ZIM
Follow us on

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरी टी-२० सामना आज होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालेला. त्यामुळे यंगिस्तान टीम इंडिया कॅप्टन शुबमन गिल याच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल. टीम इंडियान आजच्या सामन्यात एक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिलने खलील अहमद याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला असून साई सुदर्शनला आज संधी मिळाली. दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी ड्रीम 11 ला टीम लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

यष्टिरक्षक– ध्रुव जुरेल
फलंदाज– रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, ब्रायन बेनेट
अष्टपैलू– सिकंदर रझा, अभिषेक शर्मा, रियान पराग
गोलंदाज– रिचर्ड नागरावा, तेंडाई चतारा, रवी बिश्नोई आणि मुकेश कुमार
कर्णधार– अभिषेक शर्मा
उपकर्णधार– रियान पराग

टीम इंडियाला पहिल्या टी- २० सामन्यात झिम्बाब्वेने पराभूत करत मोठा कीर्तीमान रचला. टीम इंडियाला 8 वर्षांनंतर झिम्बाब्वेने पराभूत केलं. त्यामुळे हा मालिका टीम इंडियासाठी सोपी नसणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 9 टी-20 सामने झाले असून टीम इंडियाने 6 तर झिम्बाब्वेने 3 सामने जिंकले आहेत. पहिल्या टी-20सामन्यात अपयशी ठरलेले अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांच्याकडून अपेक्षा असणार आहे. टीम इंडियाकडून पदार्पण करताना तिघे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. आयपीएलमध्ये 200 च्या खेळणारे हे स्ट्राईकवर दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या टी-20सामन्यात या त्रिकुटाकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत.

टी-20 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यावर पहिल्याच टी-20 सामन्यात टीम इंडियाला दुबळ्या झिम्बाब्वे संघाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियावर काहीसा दवाब दिसणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (C), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (WK), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार