Cricket world cup 2019 लंडन : वर्ल्ड कप 2019 चा महाकुंभ 30 मे अर्थात आजपासून सुरु होत आहे. 10 संघ आणि 48 सामने असं या विश्वचषकाचं स्वरुप आहे. भारताचं बोलायचं झालं तर करोडो भारतीयांच्या विराट अपेक्षा असं या विश्वचषकाचं स्वरुप असेल. कारकिर्दीत विश्वचषकात पहिल्यांदाच भारताचं कर्णधारपद भूषवणाऱ्या विराट कोहलीकडून करोडो भारतीयांना अपेक्षा आहेत. या अपेक्षांना टीम इंडिया खरी उतरेल का,काय असतील भारतीय संघांची बलस्थानं, कुणासोबत कुठे भिडेल भारतीय संघ, कोणत्या संघाची कोणती असतील बलस्थानं?
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषकात पहिल्यांदाच खेळणारा भारतीय संघ सर्वात समतोल संघ मानला जात आहे. आपल्या सर्वांगसुंदर खेळानं या स्पर्धेत भारतीय संघाकडे फेवरेट म्हणून पाहिलं जात आहे. राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक सामना महत्वाचा असेल. भारतीय संघ 5 जून पासून आपल्या अभियानाची सुरुवात करेल.
विश्वचषकातील भारताचे सामने
हा झाला विश्व चषक 2019 मधला भारतीय संघाचा असाणारा प्रवास. 1975 ते 2015 पर्यंत झालेल्या 11 वर्ल्ड कपपैकी 2 वेळा विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या भारतीय संघाचा प्रवास कसा होता?
भारतीय संघाचा प्रवास
तर सट्टेबाजारातही क्रिकेटवर सट्ट्याचा भाव काय असेल याचा आराखडाही मांडण्यात आला आहे. विल्यम हिल आणि लॅडब्रोकर्स या दोन ऑनलाइन सट्टा लावणा-या कंपन्यांनी आपले भावही जाहीर केले आहेत. त्यानुसार
एकमेकांविरोधात लढणाऱ्या 10 संघांमध्ये रण रंगताना दिसणार आहे. एकमेकांच्या तोडीस तोड खेळ होताना इथं दिसणार आहे. क्रिकेटच्या या पंढरीत महामुकाबले होताना दिसतीलही पण विजय निश्चितच क्रिकेटचा होईल.
Captains including @Eoin16 and @imVkohli met Her Majesty and His Royal Highness before joining a Garden Party at Buckingham Palace. pic.twitter.com/AjS5eZBrVH
— The Royal Family (@RoyalFamily) May 29, 2019
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी,
दिनांक | सामना | ठिकाण |
---|---|---|
30 मे | इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका | द ओव्हल |
31 मे | पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज | ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम |
1 जून | न्यूझीलंड वि. श्रीलंका | सोफिया गार्डन्स, कार्डिफ |
1 जून | ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान | ब्रिस्टल |
2 जून | बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका | द ओव्हल |
3 जून | इंग्लंड वि. पाकिस्तान | ट्रेंटब्रिज |
4 जून | अफगाणिस्तान वि. श्रीलंका | सोफिया गार्डन्स, कार्डिफ |
5 जून | भारत वि. दक्षिण आफ्रिका | रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन |
5 जून | बांगलादेश वि. न्यूझीलंड | द ओव्हल |
6 जून | ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज | ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम |
7 जून | पाकिस्तान वि. श्रीलंका | ब्रिस्टल |
8 जून | अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड | टाँटन |
9 जून | भारत वि. ऑस्ट्रेलिया | द ओव्हल |
10 जून | दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज | रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन |
11 जून | बांगलादेश वि. श्रीलंका | ब्रिस्टल |
12 जून | ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान | टाँटन |
13 जून | भारत वि. न्यूझीलंड | ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम |
14 जून | इंग्लंड वि. वेस्ट इंडिज | रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन |
15 जून | ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका | द ओव्हल |
16 जून | भारत वि. पाकिस्तान | ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर |
17 जून | बांगलादेश वि. वेस्ट इंडिज | टाँटन |
18 जून | इंग्लंड वि. अफगाणिस्तान | ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर |
19 जून | न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम |
20 जून | ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश | ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम |
21 जून | इंग्लंड वि. श्रीलंका | हेडिंग्ले, लीड्स |
22 जून | भारत वि. अफगाणिस्तान | रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन |
23 जून | पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका | लॉर्ड्स |
24 जून | अफगाणिस्तान वि. बांगलादेश | रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन |
25 जून | इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया | लॉर्ड्स |
26 जून | न्यूझीलंड वि. पाकिस्तान | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम |
27 जून | भारत वि. वेस्ट इंडिज | ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर |
28 जून | दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका | चेस्टर- ली-स्ट्रीट |
29 जून | पाकिस्तान वि. अफगाणिस्तान | हेडिंग्ले, लीड्स |
29 जून | ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड | लॉर्ड्स |
30 जून | भारत वि. इंग्लंड | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम |
1 जुलै | श्रीलंका वि. वेस्ट इंडिज | चेस्टर-ली-स्ट्रीट |
2 जुलै | भारत वि. बांगलादेश | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम |
3 जुलै | इंग्लंड वि. न्यूझीलंड | चेस्टर-ली-स्ट्रीट |
4 जुलै | अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज | हेडिंग्ले, लीड्स |
5 जुलै | बांगलादेश वि. पाकिस्तान | लॉर्ड्स |
6 जुलै | भारत वि. श्रीलंका | हेडिंग्ले, लीड्स |
6 जुलै | ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका | ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर |
संबंधित बातम्या
WORLD CUP 2019 : वर्ल्डकपमध्ये सात नवे नियम पहिल्यांदाच लागू होणार
ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर
ICC world cup song 2019 : वर्ल्ड कपसाठी आयसीसीकडून गाणं रिलीज
कोणाची कॉमेंट्री आवडेल? वर्ल्डकपसाठी समालोचकांची यादी जाहीर
…म्हणून दिनेश कार्तिकला वर्ल्डकप टीममध्ये घेतलं : विराट कोहली
अंबाती रायुडूची निवड न झाल्याने ICC ही थक्क, स्वत: रायुडूची आकडेवारी BCCI ला दिली!